भारताचा भेदक मारा, इंग्लंड २८७ रनवर ऑल आऊट

भारतीय बॉलरच्या भेदर माऱ्यामुळे पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडचा डाव २८७ रनवर ऑल आऊट झाला. 

Updated: Aug 2, 2018, 03:50 PM IST
भारताचा भेदक मारा, इंग्लंड २८७ रनवर ऑल आऊट  title=

बर्मिंगहम : भारतीय बॉलरच्या भेदर माऱ्यामुळे पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडचा डाव २८७ रनवर ऑल आऊट झाला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात २८५/९ अशी करणाऱ्या इंग्लंडला दुसऱ्या दिवशी फक्त २ रनच करता आल्या. मोहम्मद शमीनं इंग्लंडची शेवटची विकेट घेतली. भारताकडून अश्विनला सर्वाधिक ४ विकेट मिळाल्या. तर मोहम्मद शमीला ३ विकेट घेण्यात यश आलं. उमेश यादव आणि इशांत शर्माला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं सर्वाधिक ८० रन केल्या. रूटला विराट कोहलीनं रन आऊट केलं. तर जॉनी बेअरस्टोला ७० रनवर उमेश यादवनं बोल्ड केलं.

इंग्लंडविरुद्धच्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमधल्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे. टी-२० आणि वनडे क्रिकेट सीरिजमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवला अश्विनऐवजी टीममध्ये संधी देण्यात यावी, अशी मागणी होत होती. पण विराट कोहलीनं अश्विनवर विश्वास दाखवला आणि कुलदीपला टीममध्ये स्थान मिळालं नाही. अश्विननंही विराट कोहलीचा विश्वास सार्थ ठरवत इंग्लंडला एकमागोमाग एक धक्के दिले.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा