Job News : BCCI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पाहा कोणी आणि कसा करायचा अर्ज?

BCCI Seeks to Recruit A New Selector: रोहित शर्माच्या सेनेने या सिरीजवर कब्जा तर मिळवलाय पण दुसरीकडे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ( BCCI ) भरती संदर्भात पोस्ट केली आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jan 16, 2024, 09:28 AM IST
Job News : BCCI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पाहा कोणी आणि कसा करायचा अर्ज? title=

BCCI Seeks to Recruit A New Selector: सध्या अफगाणिस्तान भारत दौऱ्यावर आली असून टी-20 वर्ल्डकपपूर्वी शेवटची सिरीज खेळण्यात येतेय. या सिरीजधील 2 सामने झाले असून यामध्ये टीम इंडियाचा विजय झाला. रोहित शर्माच्या सेनेने या सिरीजवर कब्जा तर मिळवलाय पण दुसरीकडे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ( BCCI ) भरती संदर्भात पोस्ट केली आहे. 

BCCI मधील पाच सदस्यीय राष्ट्रीय निवड समितीमधील एका पदासाठी म्हणजे नवीन सिलेक्टरसाठी अर्ज मागवण्यात आलेत. मुख्य म्हणजे हे पद रिक्त नाहीये. मात्र ही भरती आल्यानंतर सदस्यीय समितीपैकी कोणत्या एका सदस्याची विकेट पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

BCCI कोणत्या सिलेक्टरला देणार नारळ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलील अंकोला यांची पाच सदस्यीय समितीतून गच्छंती होऊ शकते. अंकोला हे पश्चिम विभागाचे सिलेक्टर आहेत. याशिवाय ते मुंबईतील दुसरे उमेदवार आहेत. यावेळी अंकोला यांच्या जागी उत्तर विभागातील माजी क्रिकेटपटू प्रतिनिधित्वाशिवाय निवड समितीमध्ये येऊ शकतात.

निवड समितीच्या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी आहे. हा अर्ज बीसीसीआयच्या वेबसाइटवर सबमिट केला जाऊ शकतो. यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. या पदासाठीच्या पात्रतेबाबत बोलताना, अर्ज करणारी व्यक्ती पाच वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्त झालेली असावी आणि गेल्या पाच वर्षांत तो कोणत्याही निवड समितीचा सदस्य नसावा. 

याव्यतिरिक्त, अर्ज करणाऱ्या व्यक्तीने किमान सात टेस्ट किंवा 30 प्रथम श्रेणी सामने किंवा 10 वनडे सामने आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असले पाहिजेत. दरम्यान मुलाखतींच्या तारखांबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित आगरकर अध्यक्ष झाल्यानंतर दोन निवडक पश्चिम विभागातून आले आहेत. चेतन शर्मा गेल्यानंतर उत्तर विभागातील एकाही निवडकर्त्याचा पॅनेलमध्ये समावेश नाही. पॅनेलमधील इतर सदस्यांमध्ये सलील अंकोला (पश्चिम), एसएस दास (पूर्व), एस शरथ (दक्षिण) आणि सुब्रतो बॅनर्जी (मध्य) यांचा समावेश आहे.