Hardik Pandya: आयपीएल सुरु होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याला दुखापत? व्हायरल Video ने वाढवली चिंता

Hardik Pandya: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी आयपीएलचा हा सिझन खूप खास आहे. तो कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्समध्ये परतत आहे. दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या पांड्यासाठी टी-20 वर्ल्डकपपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची ही मोठी संधी आहे.

सुरभि जगदीश | Updated: Mar 15, 2024, 07:45 PM IST
Hardik Pandya: आयपीएल सुरु होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याला दुखापत? व्हायरल Video ने वाढवली चिंता title=

Hardik Pandya: 22 मार्चपासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये पहिला सामना गतविजेती चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यात खेळवला जाणार आहे. दरम्यान या आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. मुंबईच्या टीमने गुजरात टायटन्ससोबत करार करून हार्दिक पंड्याला कर्णधारपदी नियुक्त केलं. दरम्यान यामुळे रोहित शर्माचे ( Rohit Sharma ) चाहते मात्र नाराज झाले होते. अशातच आता हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये पंड्या दुखापतग्रस्त असल्याचा दावा केला जातोय.  

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी आयपीएलचा हा सिझन खूप खास आहे. तो कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्समध्ये परतत आहे. दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या पांड्यासाठी टी-20 वर्ल्डकपपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची ही मोठी संधी आहे. मात्र आता हार्दिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

हार्दिक पंड्याला पुन्हा दुखापत?

सध्या ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या प्रॅक्टिस सेशन दरम्यान हार्दिक मुंबई इंडियन्सच्या जर्सीत टेबलवर पडलेला दिसतोय. यावेळी फिजिओ त्याच्यावर उपचार करताना दिसतायत. टीमचे गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगाही जवळ आहेत. ( दरम्यान झी 24 तास या व्हिडिओच्या सत्यतेचा दावा करत नाही. )

उमेश राणा नावाच्या व्हेरिफाईड ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हार्दिक पंड्याच्या या व्हिडीओवर अनेक विविध प्रतिक्रिया समोर येतायत. काही लोक हा व्हिडिओ खोटा असल्याचे सांगतायत. मात्र जर हार्दिक पंड्या खरोखरच दुखापतग्रस्त असेल तर संघासाठी मोठी समस्या असेल.

हार्दिकच्या जागी कोण होणार कर्णधार

हार्दिक पांड्या आता टीमचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू आहे. अशावेळी जर दुखापतीमुळे हार्दिक बाहेर गेला तर कर्णधारपद कोण सांभाळणार हा प्रश्न आहे. दरम्यान अशा काळात रोहित शर्माकडे ( Rohit Sharma ) कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात येऊ शकते. रोहित अजून टीम कॅम्पमध्ये दिसलेला नाही. गुरुवारी रणजी करंडक विजेतेपद पटकावणाऱ्या टीमच्या खेळाडूंसोबत एका पार्टीत तो दिसला. यावेळी नव्या जर्सीमधील रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) फोटो मात्र व्हायरल झाला आहे.