VIDEO : रोहितमुळे आली सचिनची आठवण

ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाचवी वनडे भारतानं ७ विकेट राखून जिंकली. याचबरोबर ५ मॅचची सीरिज भारतानं ४-१नं जिंकली आहे.

Updated: Oct 1, 2017, 10:41 PM IST
VIDEO : रोहितमुळे आली सचिनची आठवण title=

नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाचवी वनडे भारतानं ७ विकेट राखून जिंकली. याचबरोबर ५ मॅचची सीरिज भारतानं ४-१नं जिंकली आहे. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो रोहित शर्मा, रोहितनं १०९ बॉल्समध्ये १२५ रन्सची अफलातून खेळी केली.

या खेळीबरोबरच रोहितनं भारतामध्ये सर्वात जलद २ हजार रन्स पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला आहे. रोहितनं भारतात ४२ इनिंग्जमध्ये २ हजार रन्सचा टप्पा गाठला. याआधी सौरव गांगुलीनं ४५ इनिंगमध्ये भारतात २ हजार रन पूर्ण केल्या होत्या.

या मॅचमधले रोहित शर्माचे काही शॉट्स पाहून प्रेक्षकांना सचिन तेंडुलकरची आठवण आली. सातव्या ओव्हरमध्ये रोहित शर्मानं मार्कस स्टॉयनीसच्या बॉलिंगवर रोहित शर्मानं दोन खणखणीत फोर मारल्या.

पाहा रोहित शर्माचे अफलातून शॉट्स