IND VS AUS : झम्पा म्हटला धोनीबाबत असं काही...

 कोलकत्यात होणाऱ्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची विकेट खूप महत्त्वाची असल्याचे ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अॅडम झम्पा याने म्हटले आहे.  ती विकेट घेण्यासाठी आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 19, 2017, 07:55 PM IST
 IND VS AUS : झम्पा म्हटला धोनीबाबत असं काही...  title=

 कोलकता :  कोलकत्यात होणाऱ्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची विकेट खूप महत्त्वाची असल्याचे ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अॅडम झम्पा याने म्हटले आहे.  ती विकेट घेण्यासाठी आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 
 
 भारत गुरूवारी दुसऱ्या वन डे सामन्यात ईडन गार्डन्समध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. या सामन्यात विजय मिळवून सीरिजमध्ये २-०ची आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. 
 
 चेन्नईतील सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला २६ धावांनी पराभूत केले. या विजयात हार्दिक पांड्या आणि धोनीची भागिदारी महत्त्वाची ठरली. 

 
 झम्पा म्हणाला, धोनी अनेक वर्षापासून खेळत आहे. त्यामुळे तो ज्या पद्धतीने आपली खेळी करतो, ती त्याची खरी ताकद आहे. हार्दिक सारख्या खेळाडूला दुसऱ्या एन्डला तो मार्गदर्शक म्हणून उभा होता. त्यामुळे त्यांची भागिदारी तोडणे कठीण झाले. आम्ही पांड्याबद्दल आक्रमण  करण्याची पद्धती तयार केली. पण आम्ही धोनीमुळे करू शकलो नाही. 

पांड्याने पहिल्या सामन्यात झम्पाला आपला निशाणा बनविला. त्याने सुरूवातीला तीन षटकार लगावले.  त्यानंतर चौथा षटकार लगावल्यावर पाचवा षटकार लगावताना त्याला झम्पानेच बाद केले.