'रोहिटमॅन'च्या शिरपेचात मानाचा तुरा, असा भीमपराक्रम करणारा पहिलाच खेळाडू

रोहिटमॅन'च्या नावावर आणखी एक खास पराक्रम, ठरला पहिला भारतीय खेळाडू!

Updated: Oct 2, 2022, 09:35 PM IST
 'रोहिटमॅन'च्या शिरपेचात मानाचा तुरा, असा भीमपराक्रम करणारा पहिलाच खेळाडू title=

Ind vs Sa : भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील तिसरा T20I सामना गुवाहाटी येथील बुर्सापारा मैदानावर खेळवण्यात येत आहे.  या सामन्यामध्ये भारताने 238 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने एक खास पराक्रम आपल्या नावावर केला आहे. (Rohit Sharma record indvssa)

रोहित शर्माने आतापर्यंत क्रिकेटच्या सर्व स्पर्धांमध्ये खेळताना एकूण 400 टी-20 सामने खेळले आहेत. यामधील भारतासाठी 141 सामने, आयपीएलमध्ये मुंबईकडून 191 तर डेक्कन चार्जसतर्फे 47 सामने आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं नेतृत्त्व करताना 17 आणि इंडियन संघासाठी अधिकृत 2 आणि इंडिया एसाठी 2 असे रोहितने 400 सामने खेळले आहेत. 

रोहितने आपल्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये टी-20 मध्ये 400 सामने खेळताना 10,578 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहितने 6 शतक 71 अर्धशतकं ठोकली आहेत.  आजच्या सामन्यामध्ये रोहितने 43 धावा केल्या. 

आफ्रिकेचा बॉलिंगचा निर्णय-
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीस उतरली होती.कर्णधार रोहित शर्मा आणि के एल राहूल सलामीला उतरले होते. यावेळी टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्मा 43 धावा करून बाद झाला, त्याने 7 फोर आणि 1 सिक्स मारला होता. तर के एल राहूलने 28 बॉल 57 रन्स केल्या. या त्याच्या खेळीत त्याने 5 फोर 4  सिक्स मारले. आता दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धावांचे आव्हान असणार आहे. दक्षिण आफ्रिकेन हे आव्हान पुर्ण केल्यास ते मालिकेत बरोबरी साधतील.