Ind vs SA: एक शेर तर दुसरा सव्वा शेर, विराट-सुर्यकुमार यादव यांची तुफानी खेळी

आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात सुर्यकुमार यादव आणि विराट कोहलीने आक्रमक खेळी केली.

Updated: Oct 2, 2022, 09:06 PM IST
Ind vs SA: एक शेर तर दुसरा सव्वा शेर, विराट-सुर्यकुमार यादव यांची तुफानी खेळी title=
virat and suryakumar yadav

Ind vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील तिसरा T20I सामना गुवाहाटी येथील बुर्सापारा क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. पण आजच्या सामन्यात हिरो ठरले ते विराट कोहली आणि त्याच्या पाठोपाठ फलंदाजीला आलेला सूर्यकुमार यादव. या दोघांनी आज मैफिल लुटली. दोघांनी मिळून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. त्यामुळे आता सोशल मीडियावर यूजर्स दोघांचेही भरभरून कौतुक करत आहेत.

फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळी खेळली. मैदानावर येताच त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या सामन्यात सूर्यकुमारने अवघ्या 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 22 बॉलमध्ये 61 रनची तुफानी खेळी केली.

विराट कोहलीनेही (Virat Kohli) आफ्रिकन गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. दोन्ही खेळाडूंमध्ये अवघ्या 42 चेंडूत 102 धावांची शतकी भागीदारी पाहायला मिळाली. युजर्स या जोडीचे भरभरून कौतुक करत आहेत. विराच कोहलीने 49 रनची खेळी केली.

केएल राहुल (KL Rahul) याने 28 बॉलमध्ये 57, रोहित शर्माने (Rohit sharma) 37 बॉलमध्ये 43 तर दिनेश कार्तिकने 7 बॉलमध्ये 17 रन केले.