LIVE SCORE : बुमराहकडून 'लंका'दहन, भारताला विजयासाठी हव्या २१८ रन्स

भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेनं विजयासाठी २१८ रन्सचं आव्हान ठेवलं आहे.

Updated: Aug 27, 2017, 06:59 PM IST
LIVE SCORE : बुमराहकडून 'लंका'दहन, भारताला विजयासाठी हव्या २१८ रन्स title=

कोलंबो : भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेनं विजयासाठी २१८ रन्सचं आव्हान ठेवलं आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेणाऱ्या श्रीलंकेला ५० ओव्हरमध्ये ९ विकेट्सच्या मोबदल्यात २१७ रन्स बनवता आल्या.

भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पांड्या, अक्सर पटेल आणि केदार जाधवला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं. याआधीच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा विजय झाला होता, त्यामुळे आता ही मॅचही जिंकून सीरिज खिशात टाकण्याची संधी भारतापुढे आहे. 

लाईव्ह स्कोअरबोर्ड पाहण्यासाठी क्लिक करा