चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा सलामीला पाकिस्तानशी मुकाबला

भारताचा पुरुष हॉकी संघ येत्या २३ जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार आहे. 

Updated: Mar 16, 2018, 02:42 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा सलामीला पाकिस्तानशी मुकाबला title=

ब्रेडा(नेदरलँड्स) : भारताचा पुरुष हॉकी संघ येत्या २३ जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार आहे. 

या सामन्यानंतर युरोपियन चॅम्पियन्स नेदरलँड्स ऑलिम्पिक विजेत्या अर्जेटिनाशी भिडणार आहे. २३ जून ते एक जुलैपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. ३० जूनला भारताचा मुकाबला नेदरलँड्शी होणार आहे. 

याआधी हॉकी इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी मंगळवारी भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली. चार एप्रिलपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी पूल बीमध्ये भारतासह पाकिस्तान, मलेशिया, वेल्स आणि इंग्लंड असणार आहे. 

कर्णधार मनप्रीत सिंग आणि उपकर्णधार चिगलेसाना सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेसाठी सज्ज झालाय.