टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्मा दुखापतीमुळे आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर

टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. 

Updated: Dec 13, 2021, 07:44 PM IST
टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्मा दुखापतीमुळे आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर title=

मुंबई : टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी (India Tour Of South Africa) मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाच्या वनडे आणि टी 20 संघाचा नवनिर्वाचित कर्णधार आणि कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून (India vs South Africa Test Series) बाहेर पडला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह (Bcci Jay Shah) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (india tour south africa hitman rohit Sharma has been ruled out from test series against South Africa  due to an injury)

रोहितला नेमकं काय झालं?

रोहितला आधी सरावादरम्यान हाताला थ्रो डाऊन  स्पेशालिस्ट डी राघवेंद्रने  (Throwdown Specialis D Raghavendra) थ्रो केलेला चेंडू लागला असल्याचं म्हंटलं जात होतं.

पण आता रोहित कसोटी मालिकेतून बाहेर होण्यामागे हॅमस्ट्रिंग (left hamstring injury) इंज्युरीअसल्याचं सांगितलं आहे. यामुळे रोहितला नेमकं काय झालंय, काही लपवलं जातंय का, असा संशय क्रीडा वर्तुळातून व्यक्त केला जातोय.

रोहितऐवजी कोणाला संधी? 

रोहित मालिकेतून बाहेर झाल्याने त्याच्या जागी प्रियांक पंचालला (Priyank Panchal) संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे. 

प्रियांकने दक्षिण आफ्रिकेच्या अ संघाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याला या कामगिरीचं बक्षिस मिळालं आहे. दरम्यान रोहित कसोटी मालिकेतून बाहेर झाल्याने उपकर्णधारपदाची सूत्र कोण सांभाळणार, याकडे लक्ष असणार आहे. 

कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ

टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाल, केएल राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर आणि अरजान नगवासवाला.

आफ्रिकन टीम 

डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कगिसो रबाडा, सारेल एरवी, ब्यूरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, एडन मार्कराम, विआन मुल्डर, एनरिक नॉर्तजे, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डुर डुसेन, कायल वेरेन, मार्को जॅन्सन, ग्लेंटन स्टुअरमन, प्रिनेलन सुब्रेन, सिसांडा मॅगाला, रायन रिकेल्टन आणि डुआन ऑलिव्हियर. 

कसोटी मालिका 

पहिला सामना, 26-30 डिसेंबर,  सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन.  

दुसरा सामना, 3-7 जानेवारी 2022, इम्पीरियल वांडरर्स, जोहान्सबर्ग.  
  
तिसरा सामना,  11-15 जानेवारी 2022,  केपटाऊन.