वनडेनंतर 'विराट'सेना कांगारूंना टी-20मध्ये लोळवण्यासाठी सज्ज

भारतानं ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये कांगारूंना ४-१नं लोळवलं आहे.

Updated: Oct 1, 2017, 11:03 PM IST
वनडेनंतर 'विराट'सेना कांगारूंना टी-20मध्ये लोळवण्यासाठी सज्ज  title=

मुंबई : भारतानं ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये कांगारूंना ४-१नं लोळवलं आहे. वनडेमधल्या शानदार कामगिरीनंतर आता भारतीय टीम टी-20 मध्येही ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी सज्ज आहे. ३ टी-20 मॅचच्या या सीरिजची सुरुवात ७ ऑक्टोबरपासून होणार आहे. 

ऑस्ट्रेलियाचा ४-१नं पराभव केल्यानंतर भारतानं वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. तर टी-20मध्ये भारत पाचव्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलिया सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे टी-20 क्रिकेटमधली क्रमवारी सुधारण्याचं आव्हान विराट कोहलीच्या टीमपुढे असणार आहे.

टी-२० सीरिजचं वेळापत्रक

७ ऑक्टोबर- पहिली टी-20- रांची, डे-नाईट, सायंकाळी ७ वाजता

१० ऑक्टोबर- दुसरी टी-20- गुवाहाटी, सायंकाळी ७ वाजता

१३ ऑक्टोबर- तिसरी टी-20- हैदराबाद , सायंकाळी ७ वाजता