Team India : Cricket मध्ये आता पुरुष आणि महिला टीमच्या जर्सीचा रंग सारखा नसेल?

 क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या पुरुष आणि महिलांच्या जर्सीचा रंग जवळ-जवळ सारखाच असतो. पण आता टीम इंडियातील महिलांच्या जर्सीचा रंग हा बदलणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी इंटरनॅशनल वूमन्स डेच्या मुहूर्तावर भारतीय महिला क्रिकेट टीमला (India Women Cricket Team) एक भेट दिली. त्यांनी सांगितले की भारतीय महिला टीम या वर्षी इंग्लंड विरूद्ध एक टेस्ट मॅच खेळणार आहे.

Updated: Mar 9, 2021, 02:35 PM IST
Team India : Cricket मध्ये आता पुरुष आणि महिला टीमच्या जर्सीचा रंग सारखा नसेल? title=

मुंबई :  क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या पुरुष आणि महिलांच्या जर्सीचा रंग जवळ-जवळ सारखाच असतो. पण आता टीम इंडियातील महिलांच्या जर्सीचा रंग हा बदलणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी इंटरनॅशनल वूमन्स डेच्या मुहूर्तावर भारतीय महिला क्रिकेट टीमला (India Women Cricket Team) एक भेट दिली. त्यांनी सांगितले की भारतीय महिला टीम या वर्षी इंग्लंड विरूद्ध एक टेस्ट मॅच खेळणार आहे.



जय शाह यांनी आपल्या  ट्विटरवरुन याबद्दल माहिती देताना म्हटले आहे की, 'आंतरराष्ट्रीय महिला दिना (महिला दिन 2021) च्या दिवशी घोषणा करताना मला आनंद होत आहे, की भारतीय महिला क्रिकेट टीम या वर्षाच्या शेवटी इंग्लंडच्या महिला क्रिकेट टीम सोबत एकमेव कसोटी सामना खेळेल आणि भारतीय महिला टीम पुन्हा एकदा सफेद जर्सीमध्ये दिसून येईल. भारतीय महिला क्रिकेट टीम 2014 नंतर प्रथमच कसोटी सामना खेळेल.



सध्या भारतीय महिला त्यांच्या घरच्या मैदानावर यजमान टीम दक्षिण आफ्रिका विरुद्ध 5 सामन्यांची एक दिवसीय मालिका खेळत आहेत. या संघाचे नेतृत्व मिताली राज करीत आहे. एक दिवसीय सामन्यानंतर टीम इंडिया  दक्षिण आफ्रिके विरुद्ध 3 सामन्यांची टी -20 मालिका खेळेल, ज्याचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे.



पहिल्या एक दिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय टीमला पराभूत केले

जवळपास एक वर्षानंतर, आपला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळण्यासाठी उतरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेकडून 59 चेंडू शिल्लक असताना 8 विकेटने पराभव पत्करावा लागला.



भारतीय संघात सरावाची कमतरता स्पष्ट दिसत होती. कर्णधार मिताली राज ( 85 चेंडूत 50) आणि हरमनप्रीत कौर (41 चेंडूंत 40) यांच्या खेळीनंतरही भारतीय टीमला 21 धावांच्या आत 5 विकेट गमावल्यामुळे 9 विकेट्स गमावून 17 7 धावा केल्या.