आशिया महिला कप: पाकिस्तानवर दणदणीत विजय, भारताचा फायनलमध्ये प्रवेश

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Updated: Jun 9, 2018, 03:27 PM IST
आशिया महिला कप: पाकिस्तानवर दणदणीत विजय, भारताचा फायनलमध्ये प्रवेश title=

मुंबई : टीम इंडियाने प्रतिद्वंदी पाकिस्तानला 7 विकेटने पराभूत केलं आहे. भारतीय महिला टीमने या विजयासह आशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. क्वालालंपूरच्या ओवल मैदानात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंतला आणि आधी बॅटींग करत फक्त 72 रन केले. त्यानंतर भारतीय महिला टीमने 23 बॉल बाकी ठेवत 7 विकेटने पाकिस्तानचा धुव्वा उडवला.

टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका स्मृति मंधानाने 38 रन करत तर कर्णधार हरप्रीत कौरने नाबाद 34 रन करत बजावली. आता कर्णधार हरमनप्रीत कौरची नजर फायनल जिंकत आशिया कप मिळवण्यावर असेल. बांग्लादेश आणि मलेशियामध्ये सामना होणार आहे. जो संघ जिंकेल त्याचा फायनलमध्ये भारतासोबत सामना होणार आहे. 

पाकिस्तानला सुरुवातीलाच धक्के बसायला सुरुवात झाली. लवकर विकेट गमवल्यामुळे पाकिस्तानला मोठा स्कोर उभा नाही करता आला. 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमवत त्यांनी 72 रन केले. नाहिदा खान (18) आणि सना मीर (20) रन केले. यांच्या शिवाय कोणीही मोठी स्कोर उबा करु शकले नाहीत. 

टीम इंडियाकडून एकता बिष्टने सर्वाधिक 3 विकेट घेतले. भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे 6-6 गुण होते. पहिल्या 2 स्थानावर याच टीम होत्या. रनरेटमुळे पाकिस्तान पहिल्या स्थानावर होती.