CSK vs GT Final: थाला तूच रेsss, सामना गमावणाऱ्या Gujrat Titans चं माहीसाठी भावनिक ट्विट; हेच खरं स्पोर्ट्समन स्पिरीट

IPL 2023 CSK vs GT Final Highlights: आमच्यातलं लहान मूल आज सर्वाधिक आनंदात आहे.... माहीssss; धोनी म्हणजे सर्वकाही.., गुजरातच्या संघाची भावना हीच तुमच्या आमच्या मनातील भावना.   

सायली पाटील | Updated: May 30, 2023, 10:56 AM IST
CSK vs GT Final: थाला तूच रेsss, सामना गमावणाऱ्या Gujrat Titans चं माहीसाठी भावनिक ट्विट; हेच खरं स्पोर्ट्समन स्पिरीट  title=
IPL 2023 Gujrat titans tweet about ms dhonis massive victory is winninh hearts

CSK vs GT Final Highlights: तो जेव्हाजेव्हा येतो, तेव्हातेव्हा मैदान गाजवतो. हे असं काहीतरी महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) अर्थात कॅप्टन कूलसाठी म्हटलं जातं. क्रिकेट म्हणजे श्वास असंच म्हणत जगणारा हा माही यंदाच्या आयपीएलमध्येही त्याची जादू दाखवून गेला. संघाला गुणतालिकेत वरच्या श्रेणीतलं स्थान मिळवून देण्यापासून अगदी जेतेपदापर्यंत पोहोचवण्यापर्यंत त्यानं वेळोवेळी आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी सुरेखरित्या पार पाडली. 

यंदाच्या आयपीएलचा हंगाम सुरु झाल्या क्षणापासून ते अगदी अखेरच्या सामन्यापर्यंत प्रत्येक वेळी धोनी संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसला. त्याची खेळाप्रती असणारी जाण बऱ्याचदा पाहायला मिळाली, अंतिम सामनाही याला अपवाद ठरला नाही. मग ते पापणी लवत नाही तोच गुजरातच्या खेळाडूला स्टंपिंगमध्ये बाद करणं असो किंवा सीमारेषेपाशी डोळे बंद करून शांतपणे बसणं असो. 

गुजरातचं भावनिक ट्विट... 

''वल्ला थाला! आम्हाला ठाऊक होतं की या सामन्यात आम्हाला फक्त तुझ्या बुद्धीचातुर्याशीच नव्हे, तर चेन्नईच्या चाहत्यांचाही सामना करावा लागणार होता. आज आमचा हिरमोड झाला खरा, पण आमच्यात दडलेलं ते लहान मुल तुला चषक उचलताना पाहून आताही प्रचंड आनंदात आहे'', असं ट्विट गुजरातच्या संघाकडून करण्यात आलं. 

 

ट्विटसोबत गुजरातच्या संघानं माहीचा एक फोटोही जोडला. या दोन्ही संघांमध्ये, संघातील खेळाडूंमध्ये असणारं एक अव्यक्त नातं पाहून हेच खरं स्पोर्ट्समनशिप स्पिरीट असं म्हणत नेटकऱ्यांनीही गुजरातच्या संघाचं कौतुक केलं.

हेसुद्धा वाचा : IPL 2023 Final: ...अन् धोनीने त्याला मैदानातच उचलून घेतलं; Video झाला Viral! विराटची Insta स्टोरीही चर्चेत

 

सामन्यातील महत्त्वाच्या गोष्टी थोडक्यात... 

गुजरात टायटन्सनं घरच्याच मैदानावर खेळताना 20 षटकांमध्ये 4 गडी गमावत 214 धावा केल्या. गुजरातचं हे आव्हान स्वीकारत चेन्नईचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला खरा, पण तेव्हाच नेमका पावसानं या सामन्यात व्यत्यय टाकला. ज्यानंतर चेन्नईपुढे विजयासाठी 15 षटकांमद्ये 171 धावांचं निर्धारित लक्ष्य ठेवण्यात आलं. संघाला शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज होती. त्याचवेळी षटकाच्या पाचव्या चेंडूमध्ये रवींद्र जडेजानं षटकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत त्यानं मैदानात विजयोत्सव सुरु केला. जडेजानं या सामन्यात 6 चेंडूंवर 15 धावा करत तो नाबाद राहिला आणि चेन्नईच्या नावे पाचव्यांचा आयपीएलच्या विजेतेपदाची नोंद झाली.