Video: 6 बॉल, 29 रन, 3 ड्रॉप कॅच अन्...; लास्ट ओव्हरला असा ड्राम कधी पाहिलाच नसेल

IPL 2024 PBKS Vs SRH A FINAL OVER DRAMA: हृदयाची धडधड वाढवणाऱ्या या सामन्यातील अंतिम षटकातील घडामोडी फारच नाट्यमयरित्या घडल्या. अगदी शेवटचा चेंडू टाकेपर्यंत कोणता संघ विजयश्री खेचून आणणार याबद्दल संभ्रम कायम होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 10, 2024, 07:30 AM IST
Video: 6 बॉल, 29 रन, 3 ड्रॉप कॅच अन्...; लास्ट ओव्हरला असा ड्राम कधी पाहिलाच नसेल title=
रोमहर्षक सामन्यात हैदबादचा विजय

IPL 2024 PBKS Vs SRH Final Over Drama: इंडियन प्रिमिअर लीगच्या 23 व्या सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पंजाब किंग्ज इलेव्हनच्या संघावर निसटता विजय मिळवला. अवघ्या 2 धावांच्या फरकांनी हा सामना पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने जिंकला. या सामन्यामधील शेवटची ओव्हर विशेष चर्चेत असून सध्या सोशल मीडियावर या ओव्हरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 29 धावांची गरज असताना केवळ 2 धावांनी शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं. या शेवटच्या ओव्हरमध्ये नक्की घडलं काय ते जाणून घेऊयात...

19 व्या ओव्हरला 154 वर 6 असा होता स्कोअरबोर्ड

183 धावांचा पाठलाग करताना 19 व्या ओव्हरला पंजाबच्या संघाची धावसंख्या 154 वर 6 बाद अशी होती. 19 व्या ओव्हरला शशांक सिंह आणि अशुतोष शर्मा या दोघांनी 10 धावा काढलेल्या. शेवटची ओव्हर टाकण्यासाठी जयदेव उनाडकटने बॉल हाती घेतला. 20 व्या ओव्हरला काय घडलं पाहूयात

बॉल टू बॉल अपडेट्स...

19.1 अशुतोष शर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला.

19.2 वाईड बॉल

19.2 वाईट बॉल

19.2 अशुतोष शर्माने पुन्हा एक षटकार लगावला.

19.3 पळून 2 धावा काढल्या

19.4 पळून 2 धावा काढल्या

19.5 वाईड बॉल

19.5 पळून 1 धाव काढली

19.6 शेवटच्या चेंडूवर शशांक सिंहने षटकार लगावला.

 हैदराबादच्या खेळाडूंनी या ओव्हरमध्ये एक दोन नाही तर तब्बल 3 कॅच सोडल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये 3 षटकार, 3 वाईड बॉल, 2 दुहेरी धावा आणि एक एकेरी धाव अशा एकूण 26 धावांची आतिषबाजी शशांक आणि आशुतोषने केली.मात्र त्यांना एकूण 180 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघाने हा सामना अवघ्या 2 धावांनी जिंकला. या शेवटच्या ओव्हरची झलक खालील व्हिडीओमध्ये पाहा...

कोण कोणत्या स्थानी?

हा हैदराबादचा स्पर्धेतील तिसरा विजय ठरला असून या विजयासहीत ते पॉइण्ट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहेत. तर पंजाबचा संघ सहाव्या स्थानी आहे. पंजाबने आपल्या 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. गुजरातचा संघ सातव्या तर मुंबईचा संघ आठव्या स्थानी आहे. बंगळुरुचा संघ नवव्या आणि दिल्लीचा संघ 10 व्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी राजस्थान, दुसऱ्या स्थानी कोलकाता, तिसऱ्या स्थानी लखनऊ असून चौथ्या स्थानावर सध्या चेन्नईचा संघ आहे.