LIVE SCORE : विराट कोहलीची जोरदार फटकेबाजी

श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं शानदार सुरुवात केली आहे.

Updated: Aug 31, 2017, 03:46 PM IST
LIVE SCORE : विराट कोहलीची जोरदार फटकेबाजी title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं शानदार सुरुवात केली आहे. १७ओव्हरच्या आधीच भारताचा स्कोअर १३० रन्सच्या पुढे गेला होता. विराट कोहलीच्या झटपट अर्धशतकामुळे भारताची सुरुवात चांगली झाली. विराट कोहलीला रोहित शर्माही चांगली साथ देत आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवन फक्त ४ रन्सवर आऊट झाला.

या मॅचमध्ये भारतीय टीममधून केदार जाधव, भुवनेश्वर कुमार आणि युझुवेंद्र चहालला वगळण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी मनिष पांडे, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा 

भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल.राहुल, मनिष पांडे, एम.एस.धोनी, हार्दिक पांड्या, अक्सर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर