चेन्नईमध्ये होणारे सर्व सामने दुसऱ्या शहरात हलवणार- सूत्र

चेन्नईमध्ये होणारे सर्व सामने चेन्नईमधून दुसरीकडे हलवण्याचा विचार सुरु आहे. कोलकाता आणि चेन्नई यांच्यात झालेल्या मॅचदरम्यान खेळाडूंवर बुट फेकण्याचा प्रकार घडला. आता पोलिसांनी सामन्यांना सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चेन्नईमधील सर्व सामने आता दुसऱ्या शहरांमध्ये हलवले जाणार आहेत. 

shailesh musale Updated: Apr 11, 2018, 04:20 PM IST
चेन्नईमध्ये होणारे सर्व सामने दुसऱ्या शहरात हलवणार- सूत्र title=

चेन्नई : चेन्नईमध्ये होणारे सर्व सामने चेन्नईमधून दुसरीकडे हलवण्याचा विचार सुरु आहे. कोलकाता आणि चेन्नई यांच्यात झालेल्या मॅचदरम्यान खेळाडूंवर बुट फेकण्याचा प्रकार घडला. आता पोलिसांनी सामन्यांना सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चेन्नईमधील सर्व सामने आता दुसऱ्या शहरांमध्ये हलवले जाणार आहेत. 

तमिळनाडुमध्ये सध्या कावेरी जल विवाद सुरु आहे. मंगळवारी चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान आंदोलकांनी मैदानाबाहेर निदर्शनं केली होती. कर्नाटककडून तमिळनाडुला कमी पाणी देण्याच्या विरोधात हे आंदोलन होतं. 

मंगळवारी संध्याकाळी खेळ सुरु होताच काही आंदोलनकर्त्यांनी मैदानावर बुट आणि चप्पल फेकणं सुरु केलं. या घटनेनंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत काही जणांना ताब्यात घेतलं. रजनीकांत यांनी चेन्नईमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाच्या बाबतीत विरोध दर्य़शला आहे. त्य़ांचं म्हणणं आहे की राज्यात यावेळी कावेरी वाद सुरु आहे. अशात येथे क्रिकेट सामन्यांचं आयोजन करणं चुकीचं आहे. चेन्नई टीमला देखील समर्थन करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून होत आहे.