video : धोनीसाठी आजचा दिवस आहे स्पेशल

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भले भारतीय संघाने यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नसली तरी मात्र २०१३मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब पटकावला होता. 

Updated: Jun 23, 2017, 04:31 PM IST
video : धोनीसाठी आजचा दिवस आहे स्पेशल title=

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भले भारतीय संघाने यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नसली तरी मात्र २०१३मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब पटकावला होता. 

याच दिवशी म्हणजेच २३ जून २०१३मध्ये भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळवले होते. २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय संघाने इंग्लंडला ५ धावांनी हरवत विजेतेपद पटकावले होते. 

या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने सामना २० षटकांचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट गमावत १२९ धावा केल्या होत्या. 

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ २० षटकांत १२४ धावा करु शकला होता. या सामन्यात ५ धावांनी इंग्लंडचा संघ पराभूत झाला होता. जडेजा-अश्विनने प्रत्येकी दोन विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. रविंद्र जडेजाने दमदार गोलंदाजी करताना भारताला विजय मिळवून दिला होता.