अक्रम-अख्तरनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवं वादळ!

क्रिकेट जगताला पाकिस्ताननं वसीम अक्रम, वकार युनुस आणि शोएब अख्तर, इम्रान खानसारखे दिग्गज फास्ट बॉलर दिले आहेत.

Updated: Nov 16, 2017, 10:30 PM IST
अक्रम-अख्तरनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवं वादळ! title=

इस्लामाबाद : क्रिकेट जगताला पाकिस्ताननं वसीम अक्रम, वकार युनुस आणि शोएब अख्तर, इम्रान खानसारखे दिग्गज फास्ट बॉलर दिले आहेत. पाकिस्तान म्हणजेच फास्ट बॉलर असं समीकरण क्रिकेटमध्ये आहे. पाकिस्तानच्या फास्ट बॉलरमध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे. हा बॉलर रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर आणि वसीम अक्रम याचा उत्तराधिकारी असल्याचं बोललं जात आहे.

मोहम्मद हसनैन असं या पाकिस्तानी बॉलरचं नाव आहे. हसनैन पाकिस्तानकडून अंडर १९ टीमकडूनही खेळला आहे. हसनैनला पाकिस्तान सुपर लीगच्या इस्लामाबाद युनायटेडनं आपल्या टीममध्ये घेतलं आहे. मोहम्मद हसनैनटचा बॉलिंग टाकतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.