पाकिस्तानी क्रिकेटपटू सईद अजमलने घेतली निवृत्ती

पाकिस्तीनी क्रिकेट संघातील प्रसिद्ध गोलंदाज सईद अजमलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अजमल हा क्रिकेटपासून प्रदीर्घ काळ दूर होता. अखेर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 13, 2017, 07:29 PM IST
पाकिस्तानी क्रिकेटपटू सईद अजमलने घेतली निवृत्ती title=

कराची : पाकिस्तीनी क्रिकेट संघातील प्रसिद्ध गोलंदाज सईद अजमलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अजमल हा क्रिकेटपासून प्रदीर्घ काळ दूर होता. अखेर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.

संघाला माझे ओझे नको

वय वर्षे 40 असलेल्या या खेळाडूने निवृत्ती घेताना म्हटले की, मी फार क्रिकेट खेळलो आता संघासाठी अझे म्हणून राहण्यात अर्थ नाही. राष्ट्रीय पातळीवर खेळताना माझ्याकडे अंगुलीनिर्देश केला जाण्यापूर्वीच निवृत्ती घेतलेली चांगली. त्यामुळेच मी निवृत्ती घेत असल्याची प्रतिक्रीया अजमलने दिली आहे.

त्याच्या गोलंदाजीची लय बिघडली

अजमलने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील शेवटचा सामना 19 एप्रिल 2015मध्ये बांग्लादेशविरोधात खेळला होता. एक फिरकी गोलंदाज म्हणून त्याने पदार्पणातच नाव कमावले. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्याच्या आपल्या गोलंदाजीची लय बिघडली होती. शेवटच्या सामन्यात त्याने 9.1 षटकांमध्ये 1 गडी बाद करून 49 धावा दिल्या होत्या. मात्र, त्यांनतर त्याला संघात पुनरागमणाची संधी मिळाली नाही. त्याने आपली शेवटची टेस्ट मॅच 14 ऑगस्ट 2014मध्ये श्रीलंकेविरूद्ध खेळली होती. तर, 24 एप्रिल 2015 मध्ये बांग्लादेश विरोधात शेवटचा टी-20 सामना खेळला होता.

सईद अजमलची कामगिरी

सईद अजमलने एकूण 35 टेस्ट सामने खेळले. त्यात त्याने घेतलेल्या बळींची संख्या 178 इतकी आहे. तर, 113 एकदिवसीय सामन्यांमध्ये 184 बळी त्याच्या नावावर आहेत. तर, 64 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 85 बळी घेतले आहेत.