आर अश्विन की हरभजन, घातक स्पिनर कोण? पाहा काय म्हणाला गौतम गंभीर

स्पिनरमध्ये कोण सरस तुम्ही गौतम गंभीरच्या मताशी सहमत आहात?

Updated: Mar 8, 2022, 08:18 PM IST
आर अश्विन की हरभजन, घातक स्पिनर कोण? पाहा काय म्हणाला गौतम गंभीर title=

मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्याक टीम इंडियाने कमालीची कामगिरी केली आहे. आर अश्विन आणि जडेजा दोघांनी जी कामगिरी केली त्यामुळे जगभरात त्यांचं कौतुक होत आहे. सामन्यात जडेजानं 175 धावा करत 5 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विननं कपिल देव यांचा रेकॉर्ड तोडला. 

रोहित शर्माने जडेजा आणि आर अश्विनमध्ये अश्विन सर्वोत्तम खेळाडू असल्याचं म्हटलं होतं. तर आता गौतम गंभीरने आर अश्विन आणि हरभजन सिंग यांच्यात सर्वोत्तम स्पिनर कोण? हे सांगितलं आहे. 

हरभजन सिंग आणि आर अश्विन दोघंही सर्वोत्तम स्पिनर आहेत. त्यांनी 400 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. मात्र आर अश्विन जास्त घातक असल्याचा दावा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने केला आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये अश्विन भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी गोलंदाज असल्याचं त्याने म्हटलं आहे. 

श्रीलंकेविरुद्ध अश्विननं 6 विकेट्स घेऊन कपिल देव यांचा विक्रम मोडला. कसोटीमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीमध्ये तो 10 व्या क्रमांकावरचा गोलंदाज ठरला आहे. हा विक्रम करणं खूप जास्त कठीण आहे. मात्र त्याने हे स्वप्न पूर्ण केलं. त्यासाठी तो रात्रंदिवस झटत राहिला. अश्विन ऑफ स्पिनर करण्यात माहीर आहे. तर त्याच्या क्षमतेचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. 

हरभजन सिंगबद्दल बोलायचं तर त्याचीही गोलंदाजी चांगली होती. तो बॉलला डीप करायचा. मात्र दोघांमध्ये अश्विन जास्त घातक असल्याचं गौतम गंभीरचं म्हणणं आहे. मी एक फलंदाज म्हणून तरी अश्विननच्या बॉलचा सामना करण्यासाठी घाबरतो असं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं.