Ajinkya Rahane | आऊट ऑफ फॉर्म अजिंक्य रहाणेचं दमदार शतक

टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) गेल्या काही महिन्यांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे.

Updated: Feb 17, 2022, 07:08 PM IST
Ajinkya Rahane | आऊट ऑफ फॉर्म अजिंक्य रहाणेचं दमदार शतक title=

अहमदाबाद : टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) गेल्या काही महिन्यांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. या खराब कामगिरीमुळे अजिंक्यकडून कसोटी संघाचं कर्णधारपद काढून घेतलं. रहाणे सातत्याने निराशाजनक कामगिरी करत असल्याने त्याला संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अशा चर्चा सुरु असतानाच अंजिक्यने जोरदार मुसंडी मारत धमाकेदार शतक (Ajinkya Rahane Century) ठोकलं.   (ranji trophy saurashtra vs mumbai ajinkya rahane scored hundred)
  
अजिंक्यने रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) मुंबईकडून खेळताना सौराष्ट्र (Mumbai vs Saurashtra) विरुद्ध मोटेरामधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या ए ग्राऊंडमध्ये हे खणखणीत शतक लगावलं. अजिंक्यने 14 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 211 चेंडूत शतक पूर्ण केलं. 

अजिंक्यच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे 36 वे तर रणजी क्रिकेटमधील 24 वं शतक ठरलं. दरम्यान पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रहाणे 108 धावांवर नॉट आऊट होता.  

पहिल्या दिवसखेर मुंबईने 3 विकेट्स गमावून 263 धावा केल्या. मुंबईकडून  सरफराज खान 121 आणि रहाणे 108 धावांवर नाबाद आहेत. त्यामुळे या जोडीकडून दुसऱ्या दिवशी मोठ्या भागीदारीची अपेक्षा असणार आहे.