टीम इंडियात निवड झाल्याच्या काही तासातच जडेजाचा या पक्षाला पाठिंबा

रविंद्र जडेजाचं कुटुंब २ पक्षात वाटलं गेलं.

Updated: Apr 16, 2019, 11:46 AM IST
टीम इंडियात निवड झाल्याच्या काही तासातच जडेजाचा या पक्षाला पाठिंबा title=

मुंबई : रवींद्र जडेजाचं संपूर्ण कुटुंब राजकारणात सक्रीय आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रिवाबानंतर रवींद्र जडेजाचे वडील आणि बहिण यांनी देखील राजकारणात प्रवेश केला पण त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह आणि बहिण नैना जडेजा यांनी १४ एप्रिलला काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जामनगरमध्ये त्यांनी काँग्रेसच्या एका रॅलीत सहभाग देखील घेतला होता. रिवाबा जडेजाने जामनगरमधून निवडणूक लढवण्याच्या इच्छा व्यक्त केली होती. पण पक्षाने या ठिकाणी विद्यमान खासदार पूनम माडम यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. पण जडेजाचं कुटुंब राजकारणामुळे वाटलं गेलं आहे.

वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर ही काही तासातच भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दर्शवला आहे. लोकसभा निवडणुकीत जडेजाने भाजपचं कमळाचं चिन्ह ट्विट केला आहे. जडेजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पत्नीला टॅग देखील केलं आहे.

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकपमध्ये टीममध्ये जडेजाला जागा मिळाली आहे. टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर तीन तासात जडेजाने आपली भूमिका स्पष्ट करत भाजपला पाठिंबा दिला. सोशल मीडियावर यामुळे जडेजावर टीका देखील होत आहे. गुजरातमध्ये सर्व २६ मतदारसंघात २३ एप्रिलला मतदान होणार आहे.