IND vs AUS: काम अजून अपूर्णच...; 'या' खास कारणाने सेंच्युरीनंतरही Rohit Sharma ने काढलं नाही हेल्मेट!

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आऊट ऑफ फॉर्म होता. नुकतंच वनडेमध्ये शतक ठोकल्यानंतर आता टेस्ट क्रिकेटमध्ये देखील त्याने शतक करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

Updated: Feb 10, 2023, 03:46 PM IST
IND vs AUS: काम अजून अपूर्णच...; 'या' खास कारणाने सेंच्युरीनंतरही Rohit Sharma ने काढलं नाही हेल्मेट! title=

IND vs AUS: नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border–Gavaskar Trophy) पहिला टेस्ट सामना खेळवला जातोय. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियासमोर डोंगराप्रमाणे उभा राहिला. दुसऱ्या दिवशी नागपूरच्या मैदानात येत रोहितने शतक देखील ठोकलं. त्याच्या टेस्ट करियरमधील हे 9 वं शतक होतं. शतक ठोकल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) सेलिब्रेशन केलं. मात्र यावेळी लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न आला तो म्हणजे शतक ठोकल्यानंतर देखील का त्याने हेल्मेट काढलं नाही?

कांगारूंविरूद्ध एकटा लढला Rohit Sharma

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आऊट ऑफ फॉर्म होता. नुकतंच वनडेमध्ये शतक ठोकल्यानंतर आता टेस्ट क्रिकेटमध्ये देखील त्याने शतक करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नागपूरच्या टेस्टमध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा जुना रोहित शर्मा पहायला मिळाला. 

नागपूरचं पीच असं आहे जिथे, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादव सारखे फलंदाज स्वस्ताक माघारी परतले. मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकटाच खेळला आणि खणखणीत शतक मारलं. रोहितने त्याच्या खेळीमध्ये आतापर्यंत 14 फोर आणि 2 सिक्स लगावत 105 रन्सची खेळी केली आहे.

राहुल द्रविडने दिली शाबासकी

रोहित शर्मा (Rohit Sharma) चं शतक पूर्ण झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये बसलेले हेडकोच राहुल द्रविड आणि फलंदाजी कोच विक्रम राठोड यांनी उभे राहून रोहितसाठी टाळ्या वाजवल्या. याशिवाय त्यावेळी क्रिजवर उपस्थित असलेल्या रविंद्र जडेजाने रोहितला मिठी मारली. 

या कारणाने रोहितने काढलं नाही हेल्मेट

सामान्यपणे कोणताही फलंदाज शतक पूर्ण झाल्यानंतर त्याचं हेल्मेट काढतो. मात्र रोहित शर्माने आज शतक ठोकल्यानंतर असं केलं नाही. याचं कारण म्हणजे, त्यावेळी नागपूर टेस्टमध्ये कठीण परिस्थितीत होती. त्यामुशे ज्यावेळी रोहितचं शतक पूर्ण केलं तेव्हा त्याने हेल्मेट न काढता सेलिब्रेशन केलं. 

रोहितचा नवा रेकॉर्ड

कर्णधार रोहित शर्माने शतकासह जबरदस्त कारनामा केला आहे. कॅप्टन म्हणून शतक करण्याऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर दुसरं स्थान पटकावलं आहे. तर भारताचा कर्णधार म्हणून कसोटी, एकदिवसीय, T20 मध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिला भारतीय ठरला.