क्रिकेटपटू एस. श्रीसंतने दिली बीसीसीआयला 'ही' धमकी

माजी फास्टर बॉलर एस. श्रीसंतने थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाच धमकीचा इशारा दिलाय. माझ्यावर बीसीसीआयने देशात क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे, त्यामुळे मी दुसऱ्या कोणत्याही देशाकडून खेळू शकतो, असे संतापलेला श्रीसंत म्हणाला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 21, 2017, 04:23 PM IST
क्रिकेटपटू एस. श्रीसंतने दिली बीसीसीआयला 'ही' धमकी title=

मुंबई : माजी फास्टर बॉलर एस. श्रीसंतने थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाच धमकीचा इशारा दिलाय. माझ्यावर बीसीसीआयने देशात क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे, त्यामुळे मी दुसऱ्या कोणत्याही देशाकडून खेळू शकतो, असे संतापलेला श्रीसंत म्हणाला.

आजीवन बंदी घालण्यात आलेला माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत दुसऱ्या देशाकडून खेळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने घातलेली आजीवन क्रिकेटबंदी केरळ उच्च न्यायालयाने कायम ठेवली त्यामुळे संतापलेल्या श्रीसंतने आपण दुसऱ्या देशाकडून खेळू शकतो, असे जाहीरपणे म्हटलेय.

बीसीसीआयने माझ्यावर भारतात क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे. बीसीसीआय ही एक खासगी कंपनी आहे, त्यामुळे मला इतर कोणत्याही देशाकडून खेळण्याचे स्वातंत्र्य आहे, असे म्हणत श्रीसंत म्हणाला. त्यामुळे भविष्यात श्रीसंत हा दुसऱ्या देशाकडून खेळू शकतो, असे संकेत मिळत आहे.

तो पुढे म्हणाला, मी सध्या ३४ वर्षांचा आहे. त्यामुळे मी आणखी ६ वर्ष क्रिकेट खेळू शकतो. क्रिकेटमधून मला अतिशय आनंद मिळतो. देशातील सर्व जण बीसीसीआयला भारतीय संघ म्हणतात. मात्र सर्वांना माहिती आहे की ही एक खासगी कंपनी आहे, असे तो नमुद केलेय.