...म्हणून भारत टी-20 वर्ल्ड उंचावू शकला नाही, सचिनने सांगितल्या खेळाडूंच्या 'या' चूका!

...म्हणून टी-20 वर्ल्ड कपमधून भारत झाला बाहेर, सचिनने सांगितलं खरं कारण!

Updated: Nov 12, 2022, 09:16 PM IST
...म्हणून भारत टी-20 वर्ल्ड उंचावू शकला नाही, सचिनने सांगितल्या खेळाडूंच्या 'या' चूका! title=

Sachin Tendulkar on ind vs eng semi final T-20 World Cup : भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या सेमी फायनल सामन्यामध्ये भारताचा दारूण पराभव झाला होता. या पराभवामुळे भारताचा वर्ल्ड कपमधील प्रवास संपला आणि 130 कोटी भारतीयांचं स्वप्न भंगलं. या सामन्यामध्ये झालेल्या पराभवामुळे भारतावर सडकून टीका होताना दिसत आहे. अशातच क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणारा भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये भारतीय संघाने नेमक्या काय चुका केल्या त्या सांगितल्या आहेत. (Sachin Tendulkar on ind vs eng semifinal t20 world cup 2022 latest marathi sport news)

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पराभव अत्यंत निराशाजनक ठरला आहे. भारताने ॲडलेड ओव्हरलमध्ये 168 धावांचे लक्ष्य पुरेसे नव्हते. कारण मैदानाचा आकार असा आहे की त्याच्या साईड बाँड्री लहान आहेत. भारताने 190 धावांचं लक्ष्य द्यायला हवं होतं कारण इंग्लंड तगडा संघ आहे. आपण धावा कमी केल्या त्यासोबतच विकेट घेतल्या नाहीत त्यामुळे 10 विकेट्सने भारताचा मोठा पराभव झाल्याचं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. 

एका सामन्याच्या निकालावर तुम्ही संघाची कामगिरी ठरवू शकत नाहीत. भारत टी-20 क्रिकेटमधील नंबर वनचा संघ आहे. इथपर्यंत येण्यासाठी एक रात्र नाही नाहीतर अनेक दिवसांपासून चांगलं प्रदर्शन करावं लागतं. खेळामध्ये चढ-उतार येतच राहतात मात्र आपण एकत्र असायला हवं, असंही तेंडुलकर म्हणाला. 

दरम्यान, 2022 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्याचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात होते. पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव करत टीम इंडियाने चांगली सुरुवात केली, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 विकेट्सने पराभव झाल्यानंतर टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध आणि झिम्बाब्वेविरूद्ध विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती.