राजकारणाच्या मैदानातही Shakib Al Hasan चा राडा; निवडणूक जिंकण्याआधीच चाहत्याच्या कानशिलात लगावली, पाहा Video

Shakib Al Hasan Viral Video : बांग्लादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत (Bangladesh Parliament elections) स्टार क्रिकेटर शाकिब हसन खासदार म्हणून निवडून आला आहे. खासदार होण्याआधीच शाकिबचा रुबाब पहायला मिळाला. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jan 8, 2024, 04:32 PM IST
राजकारणाच्या मैदानातही Shakib Al Hasan चा राडा; निवडणूक जिंकण्याआधीच चाहत्याच्या कानशिलात लगावली, पाहा Video title=
Shakib Al Hasan Viral Video

Shakib Al Hasan Slaps Fan : वर्ल्ड कपमध्ये झालेला बांगलादेश विरूद्ध श्रीलंका यांच्यातील सामना चांगलाच चर्चेत आला होता, त्याला कारण होतं, बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याचा टाईम आऊटचा निर्णय..! शाकिब नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अंपायर्सवर अरेरावी असो वा भर मैदानात स्टंप्स उचलून आपटणं असो, शाकिबचा राग अनेकांनी पाहिला आहे. अशातच आता राजकारणाच्या मैदानात उतरल्यानंतर देखील शाकिब अल हसनने राडा घातल्याचं पहायला मिळालं आहे. बांग्लादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत (Bangladesh Parliament elections) शाकिब हसन खासदार म्हणून निवडून आला आहे. अशातच निवडून येण्यापूर्वीच शाकिबने थेट चाहत्याच्या कानाखाली लगावल्याचं पहायला मिळालं आहे. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या व्हायरल होत आहे.

बांगलादेशमध्ये नुकतंच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. शाकिब अल हसनने बांगलादेशमधल्या मगुरातल्या पश्चिम शहर मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत (Shakib Al Hasan win Parliament election) शाकिब अल हसनलला 1,85,388 मतं मिळाली तर विरोधकाला फक्त 45,993 मतांवर समाधान मानावं लागलं. मात्र, निवडणुकीआधी मतदान केंद्रावर जेव्हा शाकिब मतदान करण्यासाठी आला तेव्हा अनेक चाहत्यांनी गराडा घातला. 

शाकिबला पाहून अनेकांनी गर्दी केली. त्यावेळी काहींनी शाकिबसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका चाहत्याने शाकिबचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी गर्दीमुळे शाकिबचा शर्ट ओढला गेला. त्यामुळे शाकिबला राग अनावर झाला. त्याने मागे वळून थेट चाहत्याच्या कानशिलात लगावली. शाकिबच्या या कृत्यानंतर सर्वजण घाबरले अन् गर्दी कमी झाली. त्याचा हा व्हिडीओ आता समोर आला आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा>

दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना  (Sheikh Hasina) चौथ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाल्या आहेत. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने (Awami League) दमदार विजय मिळवला. अवामी लीगने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा सुपडा साफ केला. बांगालदेशमध्ये 12 व्यांदा राष्ट्रीय मतदान पार पडला. यावेळी इतिहासातील सर्वात कमी म्हणजे 40 टक्केचं मतदान झालं. शेख हसीना यांचा विजयाचा भारतालाही फायदा होणार आहे. शेख हसीना या भारताच्या भरोशाच्या सहयोगी असल्याचं याआधीही सिद्ध झालं आहे.