IPL Final 2021 | चेन्नई की कोलकाता, कोण जिंकणार ट्रॉफी? दिग्गजाची भविष्यवाणी

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील अंतिम सामन्यात (IPL 2021 Final 2021) चेन्नई (CSK) विरुद्ध कोलकाता (KKR) आमनेसामने भिडणार आहेत.

Updated: Oct 14, 2021, 10:07 PM IST
IPL Final 2021 | चेन्नई की कोलकाता, कोण जिंकणार ट्रॉफी? दिग्गजाची भविष्यवाणी title=

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील अंतिम सामना 15 ऑक्टोबरला (IPL 2021 Final 2021) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी दुबई क्रिकेट स्टेडियम येथे सुरुवात होणार आहे. चेन्नई आणि कोलकाता दिल्लीला पराभूत करत अंतिम सामन्यात पोहचली आहे. (south africa former faster bowler prediction about IPL 2021 final) 

चेन्नईची ही एकूण नववी तर कोलकाताची अंतिम फेरीत पोहचण्याची तिसरी वेळ ठरली आहे. आता या अंतिम सामन्यात कोण जिंकणार, यावरुन क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. यावरुन दक्षिण आफ्रिकेचा आणि आयपीएलमध्ये RCB कडून खेळणारा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने या फायनलबाबत भविष्यवाणी केली आहे. त्यानुसार महेंद्रसिंह धोनीची चेन्नई सुपर किंग्स जिंकणार असल्याचं स्टेनने म्हंटलंय. 

डेल स्टेन काय म्हणाला? 

"मी नेहमीच आकडेवारीवर लक्ष ठेवतो. हा सामना जुगारासारखा होणार आहे. जर 10 वेळा निकाल एकाच्या बाजूने गेला, तर किमान एकदा तरी दुसऱ्याच्या बाजूने निकाल लागेल.  मला वाटतं की केकेआरचा एक वाईट दिवस नक्की येईल. केकेआरच्या चुकीच्या निर्णयांचा आणि इयोन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक आऊट ऑफ फॉर्म असण्याची किंमत नक्कीच मोजावी लागू शकते. बुधवारी झालेल्या सामन्यात जवळपास असंच झालं होतं. कदाचित अंतिम सामन्यातही असंच होईल", असं डेलने सांगितलं.

CSK सर्वोत्तम टीम का?

डेल स्टेनने CSK सर्वोत्तम टीम का आहे, याचा खुलासा करत चेन्नईचं कौतुक केलं. मला चेन्नई शानदार टीम वाटते. चेन्नईने योग्य वेळी योग्य दिशेने वाटचाल केली आहे. धोनीने दिल्ली विरुद्ध उत्तम बॅटिंग केली. तसेच नेतृत्वाची जबाबदारीही चोखपणे पार पाडली. चेन्नईचे फलंदाज फॉर्मात आहेत. कोलकाता अंतिम सामन्यात कदाचित पराभूत होईल, असं मला वाटतं", असं स्टेनने नमूद केलं. त्यामुळे डेल स्टेनची भविष्यवाणी खरी ठरणार की कोलकाता तिसऱ्यांदा विजेतेपद पटकवणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल.