युवराज सिंगचा रेकॉर्ड तुटला, 'या' क्रिकेटरने एका ओव्हरमध्ये लगावले ७ सिक्सर

युवराज सिंगने २००७ साली टी-२० क्रिकेट मॅचमधील एका ओव्हरमध्ये सहा सिक्सर लगावत नवा रेकॉर्ड केला.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 14, 2017, 08:48 PM IST
युवराज सिंगचा रेकॉर्ड तुटला, 'या' क्रिकेटरने एका ओव्हरमध्ये लगावले ७ सिक्सर title=
File Photo

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात युवराज सिंग याला भारताचा सिक्सर किंग असं म्हटलं जातं. युवराज सिंगने २००७ साली टी-२० क्रिकेट मॅचमधील एका ओव्हरमध्ये सहा सिक्सर लगावत नवा रेकॉर्ड केला.

मात्र, युवराज सिंगपूर्वी सहा सिक्सर मारण्याचा हा कारनामा आणखीन एका क्रिकेटरने केला होता. हर्शल गिब्सनंतर युवराज सिंग हा दुसरा प्लेअर होता ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा केला.

एका ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारण्याचा रेकॉर्ड तुटला

पण, आता एका ओव्हरमध्ये सहा सिक्सर मारण्याचा सर्वांचाच रेकॉर्ड तुटला आहे. होय... हा रेकॉर्ड तोडला आहे तो म्हणजे श्रीलंकन क्रिकेटरने.

या क्रिकेटरने केला नवा रेकॉर्ड 

श्रीलंकेच्या अंडर-१५ मुरली गुडनेस कपमध्ये युवा प्लेअर नविंदु पसारा याने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. नविंदु याने एका ओव्हरमध्ये सलग ७ सिक्सर लगावत एक नवा रेकॉर्ड केला आहे.

मुरलीधरनने केलं कौतुक

नविंदु ज्यावेळी एकामागे एक ७ सिक्सर लगावत होता ती मॅच पाहण्यासाठी मुथय्या मुरलीधरन मुख्य अतिथी होता. नविंदु पसाराचा खेळ पाहून मुरलीधरनलाही धक्काच बसला. मॅच संपल्यानंतर मुरलीधरनने नविंदु पसाराचं तोंडभरुन कौतुकही केलं.

अशा प्रकारे लगावले ७ सिक्सर

झालं असं की, बॉलने एका ओव्हरमध्ये नो बॉल टाकला आणि त्या नो-बॉलवरही नविंदुने सिक्सर लगावला. अशा प्रकारे नविंदु पसारा याने एका ओव्हरमध्ये ७ सिक्सर लगावत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

navindu pahasa, sri lankan batsman,
Image: Cricket age

मुरलीधरन या युवा क्रिकेटरचं केवळ कौतुकचं केलं नाही तर भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. कुमार संगाकारा, सनथ जयसुर्या, महेला जयवर्धने सारख्या क्रिकेटर्सने निवृत्ती घेतल्यानंतर आता श्रीलंकन टीमला अशाच स्फोटक बॅट्समनची गरज आहे.