Rohit Shamra | 'हिटमॅन' रोहितचं कौतुक, तर विराटबाबत काय म्हणाला गंभीर?

टीम इंडियाच्या (Team India) टी 20 आणि एकदिवसीय कर्णधारपदाची (Captaincy) जबाबदारी विराट कोहलीकडून (Virat Kohli) काढून रोहित शर्माला (Rohit Sharma) देण्यात आली आहे.  

Updated: Dec 13, 2021, 08:09 PM IST
Rohit Shamra | 'हिटमॅन' रोहितचं कौतुक, तर विराटबाबत काय म्हणाला गंभीर?  title=

मुंबई : टीम इंडियाच्या (Team India) टी 20 आणि एकदिवसीय कर्णधारपदाची (Captaincy) जबाबदारी विराट कोहलीकडून (Virat Kohli) काढून रोहित शर्माला (Rohit Sharma) देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या (Bcci) या निर्णयाचं काही जणांकडून स्वागत केलं जातंय. तर काहींकडून कडाडून विरोधही केला जातोय. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने या निर्णयाचं स्वागत केलंय. तसंच गंभीरने रोहित आणि विराटबाबत प्रतिक्रियाही दिली आहे. (team india former opener gautam gambhir give reaction over to team india t 20i and odi captaincy rohit sharma and virat kohli)  

गंभीर काय म्हणाला? 

"टीम इंडियाकडे व्हाईट आणि रेड बॉल क्रिकेटसाठी स्वतंत्र असे 2 कर्णधार आहेत. जे की संघासाठी चांगली संकेत आहेत. विराटने आपल्या फलंदाजीवर लक्ष द्यायला हवं आणि रोहितला मदत करायला हवी. तसेच विराट आता जबाबदारीतून मोकळा झाल्याने आणखी आक्रमकपणे खेळले", असं गंभीर म्हणाला. गंभीर झी हिंदुस्तानसह बोलत होता.    

"रोहित कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी करेल. व्हाईट बॉल क्रिकेटचं भविष्य आता सुरक्षित हातात आहे", असं गंभीरने नमूद केलं. 

विराटकडे कसोटी संघाचं कर्णधारपद कायम आहे. याचाच अर्थ कसोटी संघाचं भविष्य हे सुरक्षित नसल्याचं अर्थ गंभीरच्या या विधानातून निघतो. 

रोहितला कर्णधारपदाचा अनुभव

रोहितने अनेकदा विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाचं यशस्वीरित्या नेतृत्व केलं आहे. आयपीएलमध्ये रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे.  

विराटचा कर्णधारपदाचा अनुभव 

विराटने एकूण 95 सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलंय. यापैकी 65 सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. तर 27 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. एक सामना टाय राहिला तर उर्वरित 2 सामन्यांचा निकाल लागला नाही. 

दरम्यान टीम इंडिया लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्याला जाणार आहे. भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) आफ्रिके विरुद्ध कसोटी आणि एकदविसीय मालिका खेळणार आहे. 

या दौऱ्याची सुरुवात ही 26 डिसेंबरपासून कसोटीने मालिकेने होणार आहे. टीम इंडिया आफ्रिकेसाठी 16 डिसेंबरला उड्डाण भरणार आहे.