टीम इंडियाच्या पराभवानंतर ढसाढसा रडला 'हा' खेळाडू!

केपटाऊनच्या मैदानावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवला असता तर इतिहास रचता आला असता. या मैदानावर कोणत्याही संघाला 288 रन्सचं लक्ष्य गाठता आलं नव्हतं.

Updated: Jan 24, 2022, 10:39 AM IST
टीम इंडियाच्या पराभवानंतर ढसाढसा रडला 'हा' खेळाडू! title=

केपटाऊन : टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 4 रन्सनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू कॅमेरासमोर ढसाढसा रडू लागला. टीम इंडियाचा खेळाडू दीपक चहरने भारताला हा सामना जवळपास जिंकून दिला होता, पण जिंकण्यासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना तो बाद झाला. पुढील फलंदाजांन साजेशी कामगिरी करता न आल्याने टीम इंडिया हा सामना 4 रन्सनी गमवावा लागला.

केपटाऊनच्या मैदानावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवला असता तर इतिहास रचता आला असता. या मैदानावर कोणत्याही संघाला 288 रन्सचं लक्ष्य गाठता आलं नव्हतं. दीपक चहरने 34 बॉलमध्ये 54 रन्स सामना भारताच्या बाजूने खेचण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. मात्र तो आऊट झाला आणि त्याला टीमला विजय मिळवून देता आला नाही. यानंतर दीपक चहर ढसाढसा रडू लागला. 

पराभवानंतर दीपक चहरचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. चाह्यांनी दीपकला समर्थन देत विविध प्रतिक्रिया दिल्यात. सोशल मीडियावर एका यूजरने लिहिले की, 'भारत अवघ्या 4 धावांनी हरला, आफ्रिकेने मालिका 3-0 ने जिंकली पण दीपक चहरला सलाम.' 

तर एका एका युजरने लिहिलंय की, "दीपकने त्याच्या टीमसाठी अप्रतिम खेळी केली. अभिनंदन." शिवाय, "तू उत्तम इनिंग खेळलीस," असं एका व्यक्तीने ट्विट केलं आहे. 

भारताच्या पराभवानंतर निराश झालेल्या दीपकवर एक जण म्हणाला, "हे पाहून खूप वाईट वाटलं. गोलंदाज असूनही त्याने टीमला विजय मिळवून देण्यासाठी फलंदाजाप्रमाणे खेळी केली. पण शेवटी दीपक बाद झाल्याने सर्व फिस्कटलं. हा खेळाडू रडतोय कारण तो बाद झाल्यानंतर सर्व खेळ खराब झाला."