पाकिस्तानने टीम इंडियाच्या या खेळाडूला केले सर्वाधिक गूगल सर्च

पाकीस्तानने त्यांचे खेळाडू कॅप्टन सरफराज अहमद आणि फास्ट बॉलर मोहम्मद आमिर यांनाही एवढे सर्च केले नाही. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 16, 2017, 08:05 AM IST
पाकिस्तानने टीम इंडियाच्या या खेळाडूला केले सर्वाधिक गूगल सर्च  title=

नवी दिल्ली : इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या कोणत्याही खेळाचा सामना हा रोमांचक होतोच. दोघेही एकमेकांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी आहेत.

त्यामूळे अशा मॅच दरम्यानचा प्रत्येक क्षण हा रोमांचकारी असतो. एखाद्या युद्धभूमीप्रमाणे खेळाच्या मैदानाला रूप आलेले असते. 

'बात तो बनती है बॉस'

असे असताना संपूर्ण पाकिस्तानातून टीम इंडियाच्या एखाद्या खेळाडूला सर्च केले जाणे हा विषय उत्सूकतेचा ठरतो.

एखाद्या पाकिस्तानी खेळाडूपेक्षाही जास्त वेळा भारतीय खेळाडूचीच चर्चा असेल तर 'बात तो बनती है बॉस'. 

'कोहली द बॉस'

गुगलकडून आलेल्या ट्रेंड्स रिपोर्टनुसार पाकिस्तानात टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला सर्वाधिक सर्च करण्यात येत आहे.

त्यामूळे विराटची लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे. 

सोशल मीडियाच्या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर कोहलीला २१ मिलिअन फॉलोअर्स आहेत.

सरफराज आणि मोहम्मद आमिरला टाकले मागे

१८ डिसेंबर २०१६ ते ९ डिसेंबर २०१७ या दरम्यान पाकिस्तानी गुगलवर कोहलीला सर्वाधिक सर्च केले गेले.

महत्वाच म्हणजे, पाकीस्तानने त्यांचे खेळाडू कॅप्टन सरफराज अहमद आणि फास्ट बॉलर मोहम्मद आमिर यांनाही एवढे सर्च केले नाही.

कोहलीने पाकच्या गुगल ट्रेंडींग आकडेवारीत या दोघांनाही मागे टाकले आहे.

हनीमून नंतर साऊथ आफ्रिका दौरा

११ डिसेंबरला अनुष्कासोबत इटलीत लग्न करणारा कोहली रोम मध्ये हनीमूनवर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तो टीम इंडीयाशी जोडला जाईल.

मैदानातच स्पर्धक 

कोहलीला शाहिद आफ्रिदीसमवेत अनेक पाक क्रिकेटर्सनी शुभेच्छा दिल्या. आम्ही केवळ मैदानात स्पर्धक आहोत मैदानाबाहेर नाही हे या ट्विटमधून दिसून आले.