हे रेकॉर्ड करणारा विराट जगातला एकमेव खेळाडू

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवला.

Updated: Jul 30, 2017, 09:09 PM IST
हे रेकॉर्ड करणारा विराट जगातला एकमेव खेळाडू  title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवला. या टेस्टमध्ये विराट कोहलीनं टेस्ट क्रिकेटमधली त्याचं सतराव शतक झळकवलं. या शतकाबरोबरच विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोखं रेकॉर्ड बनवलं आहे.

टेस्ट, वनडे आणि टी20मध्ये ५०पेक्षा जास्त अॅव्हरेज असणारा विराट कोहली एकमेव खेळाडू आहे. टेस्टमध्ये विराट कोहलीचं अॅव्हरेज ५०.०३, वनडेमध्ये ५४.६८ तर टी20मध्ये ५२.९६ एवढं आहे.

५८ टेस्टमध्ये विराट कोहलीनं ४,६०३ रन्स बनवल्या आहेत. तर वनडेमध्ये त्यानं १८९ मॅचमध्ये २८ शतकांसह ८,२५७ रन्स बनवल्या आहेत. ४९ टी20मध्ये विराटच्या १,७४८ रन्स आहेत.