INDvsNZ LIVE: भारताला दुसरा झटका, विराट कोहली आउट

 विराटचे अर्धशतक चुकले!

Updated: Jan 23, 2019, 01:57 PM IST
INDvsNZ LIVE: भारताला दुसरा झटका, विराट कोहली आउट title=

नेपियर :  रोहित शर्मा आउट झाल्यानंतर, मैदानात उतरलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपला विकेट गमवला आहे.  भारत १४०/२  (३० ओव्हर)

भारत आणि न्युझीलंडमधील एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी ४१ धावांची गरज आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिखरने ६ चौकारच्या मदतीने  शानदार अर्धशतक ठोकले आहे  .  सामना सुरुवातीपासुनच शिखर धवन आक्रमक दिसत होता. या सामन्यात रोहित शर्मा आउट झाल्यानंतर, भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतावर दबाव पडू दिला नाही. भारत ११५/१ (२५ ओव्हर)

सुर्यप्रकाश डोळ्यांवर पडत असल्यामुळे फलंदाजाला खेळताना अडचण निर्माण होत होती. मैदानातील धावपट्टी उत्तर- दक्षिणेच्या दिशेला असते. परंतू, या मैदानातील धावपट्टी पूर्व- पश्चिम अशी करण्यात आली आहे. त्यामुळे सुर्यप्रकाश खेळाडूंच्या डोळ्यांवर पडत असल्यामुळे त्यांना खेळताना त्रास होत होता. सुर्य मावळ्यानंतरच सामना पुन्हा सुरु करण्यात येईल. असे पंचानी सांगितले होते. यामुळे ३० मिनिटांसाठी सामना थांबवण्यात आला होता.  भारत ६२/१ (१३ ओव्हर)

भारत आणि न्युझीलंड सामन्याची चांगली सुरुवात होत असताना, भारताचा पहिली विकेट पडली आहे. रोहित शर्माने ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर गप्टीलच्या हातात झेल दिला. भारतीय संघाला जिंकण्यासाठी  २४० चेंडूमध्ये ११४ धावांची गरज आहे. भारत ४४/१ (१० ओव्हर)

न्युझीलंड आणि भारताच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यात ४१ धावांची भागेदारी झाली आहे.  सामन्याच्या सुरुवातीपासुनच शिखर धवन त्याच्या स्वत:च्या अंदाजात खेळताना दिसत आहे. या सामन्यात धवनने  ५ चौकार मारुन २९ (३२) धावा केल्या तर, दुसऱ्या बाजूस रोहित शर्माने ११ (२२) धावा केल्या आहेत. तसेच सातव्या ओव्हरमध्येच न्युझीलंडच्या संघाने २ बळी गमावले होते.  भारत ४१/० (९ ओव्हर)  

भारत आणि न्युझीलंडच्या पहिल्या सामन्यात नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांकडून उत्तम कामगिरी बघायला मिळाली आहे. न्युझीलंडचा संघ केवळ १५७ धावा करु शकला. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामी देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. रोहित १०, तर शिखर १५ धावांवर खेळत आहेत. भारत १९/० (७ ओव्हर)