"बंद करून टाका क्रिकेटमधील हा फॉर्मेट", माजी क्रिकेटपटू वसिम अक्रमच्या विधानानंतर खळबळ

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसिम अक्रमच्या विधानानंतर क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. 

Updated: Jul 21, 2022, 07:42 PM IST
"बंद करून टाका क्रिकेटमधील हा फॉर्मेट", माजी क्रिकेटपटू वसिम अक्रमच्या विधानानंतर खळबळ title=

Wasim Akram: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसिम अक्रमच्या विधानानंतर क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. एकदिवसीय क्रिकेटचा फॉर्मेट जुना झाल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच हा फॉर्मेट बंद करण्यास सांगितलं आहे. त्याच्या वक्तव्यानंतर 50 षटकांच्या एकदिवसीय सामन्यांचं अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अक्रमने हे विधान केलं आहे. 

वसिम अक्रमने एका मुलाखतीत सांगितलं की, 'मला वाटते आता एकदिवसीय क्रिकेट फॉर्मेट बंद केला पाहीजे. इंग्लंडमध्ये स्टेडियम खचाखच भरलेले असतात. पण भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय सामन्यादरम्यान स्टेडियम रिकामी असतात. फक्त नावासाठी वनडे क्रिकेट खेळवलं जातं आहे. हा फॉर्मेट आता जुना झाला आहे. स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणं धक्कादायक आहे. मी त्याच्यासोबत आहे. एक समालोचक म्हणून एकदिवसीय फॉर्मेट ओढूनताणून खेचल्यासारखा वाटत आहे. खासकरून टी 20 फॉर्मेट आल्यानंतर, हा खेळ चार तासात संपतो. त्यात जगभरात अनेक लीग खेळल्या जात असून पैसा देखील मिळत आहे. हा आधुनिक क्रिकेटचा भाग आहे. त्यामुळे टी 20 आणि कसोटी क्रिकेट ठेवून एकदिवसीय फॉर्मेट बंद केला पाहीजे.'

'कसोटी क्रिकेटमध्ये एका युद्धासारखं आहे. माझी या फॉर्मेटला पसंती आहे. एकदिवसीय मजेदार होतं. पण कसोटीतून खेळाडूची खरी ओळख होते', असंही अक्रमने पुढे सांगितलं.