महिला टी-२० वर्ल्डकप २०२०: भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

 भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय 

Updated: Feb 21, 2020, 04:55 PM IST
महिला टी-२० वर्ल्डकप २०२०: भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय title=

सिडनी : आयसीसी महिला टी२० वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला आहे.Women's T20 World Cup 2020 च्या पहिल्या सामन्यात भारताने दणदणीत सुरुवात केली आहे. पूनम यादवच्या बॉलिंग समोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागला. पूनम यादवने चांगली कामगिरी करत सामना जिंकवला. भारताने ऑस्ट्रेलिया टीमचा 7 रनने पराभव केला. पूनम यादवने चार ओव्हरमध्ये १९ रन देत ४ विकेट घेतले.

टीम इंडियाने १३३ रनचं टार्गेट ऑस्ट्रेलिया समोर ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाची टीम २० ओव्हरमध्ये ११५ रन करु शकली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ तंबूत परतला. वर्ल्डकपची सुरुवात भारतीय महिला संघाने विजयाने केली आहे.

ऑस्ट्रेलियाकडून बेथ मूनीने ६ रन केले. शिखा पांडेने तिला आऊट केलं. त्यानंतर नवव्या ओव्हरला ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका लागला. मेग लेनिंग ५ रनवर आऊट झाली.

टॉस जिंकत आधी ऑस्ट्रेलियाने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय टीमकडून दीप्ति शर्माने नाबाद ४९ रन केले. ज्यामुळे भारताचा स्कोर १३२ रन पर्यंत पोहोचू शकला. महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.