World Cup 2019 : वेस्ट इंडिजच्या बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण

२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे.

Updated: May 31, 2019, 05:10 PM IST
World Cup 2019 : वेस्ट इंडिजच्या बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण title=
फोटो सौजन्य : आयसीसी

नॉटिंगहम : २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानचा फक्त १०५ रनवर ऑल आऊट झाला आहे. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर वेस्ट इंडिजच्या बॉलरनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानला धक्के द्यायला सुरुवात केली.

पाकिस्तानचा ओपनर फकर जमान आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या बाबर आजम याने प्रत्येकी सर्वाधिक २२ रन केल्या. वेस्ट इंडिजकडून फास्ट बॉलर ओशेन थॉमसने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर कर्णधार जेसन होल्डरला ३, आंद्रे रसेलला २ आणि शेल्डन कॉटरेलला १ विकेट मिळाली. वेस्ट इंडिजच्या फास्ट बॉलरनी पाकिस्तानच्या शॉर्ट पिच बॉल टाकून विकेट घेतल्या.

पाकिस्तानचा वर्ल्ड कप इतिहासातला हा दुसरा सगळ्यात कमी स्कोअर आहे. याआधी १९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानचा ७४ रनवर ऑल आऊट झाला होता.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा