राजधानी दिल्लीत रंगतोय WWEचा थरार...

आजवर आपन टीव्हीवर  WWEचा थरार पाहिलाच असेल. पण, आता हा थरार पुन्हा एकदा भारतामध्ये पहायला मिळणार आहे. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये हा थरार अनुभवायला मिळेल. या स्टेडियममध्ये सुमारे 20 हजार लोक एका वेळी या थराराचा अनुभव घेऊ शकतील. अधिकाधीक लोकांना हा थरार अनुभवता यावा याचसाठी कंपनीनेने या स्टेडियमची निवड केली आहे. भारतातील अनेक  WWEप्रेमी या थरारासाठी उत्सुक आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 6, 2017, 04:41 PM IST
राजधानी दिल्लीत रंगतोय  WWEचा थरार... title=

नवी दिल्ली : आजवर आपन टीव्हीवर  WWEचा थरार पाहिलाच असेल. पण, आता हा थरार पुन्हा एकदा भारतामध्ये पहायला मिळणार आहे. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये हा थरार अनुभवायला मिळेल. या स्टेडियममध्ये सुमारे 20 हजार लोक एका वेळी या थराराचा अनुभव घेऊ शकतील. अधिकाधीक लोकांना हा थरार अनुभवता यावा याचसाठी कंपनीनेने या स्टेडियमची निवड केली आहे. भारतातील अनेक  WWEप्रेमी या थरारासाठी उत्सुक आहेत.

बॉलीवूडलाही WWEचे आकर्षण

आपला व्यवसाय वाढविण्यासाठी  WWEने भारतात लाईव्ह इव्हेंट करण्याचे ठरवले आहे. हा थरार पाहणे ही एक वेगळीच अनुभूती राहीली आहे. लहानांपासून थोरांपर्यंत अनेक लोक  WWEचे चाहते आहेत. हा थरार पाहण्यासाठी बॉलिवूड स्टार्सही उत्सुक आहेत. त्यापैकी काहींनी आपली उत्सुकता सोशल मीडियावरही शेअर केली आहे. यात अभिनेता वरून धवनचा समावेश आहे.

वरूनने केले ट्विट

आपल्या ट्विटर हॅंडलवरून वरून धवनने  WWEला प्रमोट केले आहे. वरून धनवने म्हटले आहे की, 9 डिसेंबरला राजधानी दिल्लीत  WWEचा सामना रंगत आहे. पहिलाच मुकाबला जिंदर आणि ट्रीपल एच सोबत होत आहे. सेंथ रोलिंसला टॅग करत वरूनने आपण त्याचे फॅन असल्याचेही ट्विटरच्या माध्यमातून सांगून टाकले आहे. यापूर्वी विनोदी अभिनेता कपील शर्मानेही  WWEची आपली दीवानगी जाहीर केली होती.