आधार कार्ड

`आधार कार्ड`साठी कायमस्वरूपी नोंदणी केंद्र

आधार क्रमांकासाठी आतापर्यंत ज्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांच्यासाठी कायमस्वरूपी आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

May 25, 2013, 11:46 AM IST

पगार पाहिजे, तर ‘आधार कार्ड’ हवचं

मुंबईसह सहा जिल्ह्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांना आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलयं. आधार कार्ड नसलेल्यांचे वेतन भविष्यात रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

Apr 25, 2013, 11:04 AM IST

‘ई-आधार’ कोलमडला...

`आधार’ कार्डसाठी मुंबईतून नोंदविण्यात आलेल्या सुमारे तीन लाख नागरिकांचा डेटा बंगळुरला पाठवताना नष्ट झाला. डेटा असलेली हार्ड डिस्क खराब झाली आहे.

Apr 24, 2013, 10:28 AM IST

आधारकार्डावर आता जन्मतारखेची नोंद!

आधार कार्डाचा ओळखपत्र म्हणून वापर अनेक ठिकाणी सुरू झालाय. या कार्डावर जन्मतारीखेचा उल्लेख असायलाच हवा, ही सरकारी अट आहे. परंतू, आत्तापर्यंत कित्येकांच्या हातात जन्मतारेखेविनाच आधारकार्ड पडलंय.

Apr 9, 2013, 04:06 PM IST

`केवळ `आधार` नाही म्हणून जनता निराधार नाही`

अनुदान किंवा स्कॉलरशिपसारख्या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही, केवळ आधारकार्ड नाही म्हणून हे लाभ मिळण्यात लाभधारक व्यक्ती अपात्र ठरणार नाही, असं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील रहिवाशांना दिलंय.

Mar 19, 2013, 12:28 PM IST

आधार कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांना `आधारच नाही`

मुंबईतील आधार कार्ड काढण्यासाठी जाणा-या अनेक जेष्ठ नागरिकांना सध्या त्रासाला सामोरं जावं लागतंय... अनेक ठिकाणी जेष्ठ नागरीकांच्या बोटांचे ठसे एनरॉलमेंट मशीनवर उमटतच नाहीत...

Feb 6, 2013, 10:39 AM IST

आधार कार्डाच्या नावाने फसवणाऱ्या भामट्याला अटक

आधार कार्ड बनवून देतो असं सांगत शेकडो नागरिकांना गंडा घालणा-या भामट्याला पिंपरी-चिंचवडमध्ये अटक करण्यात आली आहे. आधार कार्ड बनवून देण्यासाठी त्यानं अजब शक्कल लढवली. पण शेवटी तो जाळ्यात अडकलाच.

Jan 24, 2013, 07:03 PM IST

आधारकार्डामुळे पासपोर्ट मिळवणं झालं सोप्पं...

आता पासपोर्टसाठी तुम्हाला तुमची सगळी कागदपत्रं चाचपडत बसण्याची गरज नाही. कारण, केवळ आधारकार्डच्या साहाय्यानं तुम्ही आता सहज पासपोर्ट मिळवू शकणार आहात. आधार नंबरवरूनच तुमचा पत्ता आणि ओळखपत्र ग्राह्य मानून पासपोर्ट वितरीत करण्यात येणार आहेत.

Jan 9, 2013, 01:27 PM IST

बीएमसीचा निर्धार, विना`आधार` नाही पगार!

मुंबई महापालिकेने २० हजार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय. हा दणका आधार कार्डमुळे कर्मचाऱ्यांना बसणार आहे. आधार कार्ड काढण्याकडे कानाडोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार रोखला जाणार आहे. त्यामुळे विना आधार कार्ड, नाही पगार अशी भूमिका पालिकेने घेतली आहे.

Jan 2, 2013, 05:21 PM IST

दोन रुपयांत मिळणार इंटरनेटवरून आधार कार्डची प्रत!

नोंदणीनंतर अनेकांना वेळेवर कार्ड मिळत नसल्याची स्थिती आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनातर्फे इंटरनेटवरून दोन रुपयांत आधार कार्डची प्रिंट उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Dec 27, 2012, 04:26 PM IST

बांगलादेशींकडेही आढळलं आधारकार्ड

आधारकार्ड ही भारतीय नागरिकत्वाची एक महत्वाची ओळख बनू लागण्या आगोदरच त्यातही बनवा बनवी होऊ लागल्याचं गोवंडीमध्ये लक्षात आलं. सर्व सरकारी योजनांसाठी आवस्यक असणारं आधार कार्ड एक बांगलादेशी घुसखोरांकडेही असल्याचंही दिसून आलंय.

Dec 13, 2012, 10:28 PM IST

मोबाईल सीमकार्डचा `आधार`....

आता यापुढे तुम्हाला मोबाईलसाठी नवं सीमकार्ड खरेदी करायचं असेल तर तुमचं आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र सादर करावं लागणार आहे.

Dec 10, 2012, 05:49 PM IST

`टेंभली लाईव्ह` निराधार!

नंदूरबार जिल्ह्यातल्या टेंभली या गावातून केंद्र सरकारने आधारकार्ड योजनेची सुरूवात केली. पण या गावच्या सरपंचांनाच अद्याप आधारकार्ड मिळालं नाही तर आदिवासी बांधवांना आधारकार्ड काय हेही माहित नाही. म्हणजे जेथुन या आधारकार्ड योजनेला सुरूवात झाली तिथेच आधारकार्ड मिळाल नसल्याचं वास्तव आहे.

Dec 6, 2012, 06:17 PM IST

आधार कार्डवरूनच गॅस वितरण

मनरेगा किंवा अन्य सरकारी योजनांच्या लाभार्थींना थेट आधार कार्डाद्वारे बँक खात्यात थेट पैसे आता जमा होऊ शकणार आहेत. या योजनेचा आरंभ पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते राजस्थानमधल्या दुदू इथं करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 21 कोटीव्या कार्डाचं वाटप करण्यात आलं.

Oct 20, 2012, 02:22 PM IST

अफगाणी नागरिकाला आधार 'आधार कार्डचा'

गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात अवैधपणे राहणाऱ्या अफगाणिस्तानच्या एका नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. बशीर शाह असं या अफगाणी नागरिकाचं नाव असून त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड सापडल्यानं खळबळ उडाली आहे.

Jan 9, 2012, 01:05 PM IST