काँग्रेस

राहुल गांधी यांना दिलासा! देशाच्या राजकारणावर आणि I.N.D.I.A वर काय होणार परिणाम?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय... मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधींना झालेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय... या निर्णयाचा देशाच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणाराय

 

Aug 4, 2023, 08:38 PM IST

राहुल गांधी यांनी गोव्यावरुन आणला 'या' खास जातीचा श्वान, राष्ट्रपतींनी केला होता सन्मान

काँग्रेस नेता राहुल गांधी गोव्यावरुन दिल्लीला परतले. पण गोव्यावरुन येताना त्यांनी जॅक रसेल टेरियर जातीचा श्वान खरेदी केला. या श्वानाबरोबरचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Aug 4, 2023, 01:57 PM IST

आमदारांच्या विकास निधी वाटपात अन्याय, न्यायालयात जाण्याचा काँग्रेसचा इशारा

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतंच आमदारांना विकास निधीचं वाटप केलं. यात शिंदे गट, शरद पवार गटाच्या आमदारांना निधीचा वर्षाव केला. तर भाजपाच्या प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात सर्वाधिक निधी दिला. पण दुसरीकडे सर्वात कमी निधी मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

Jul 26, 2023, 07:54 PM IST

राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप, पंकजा मुंडे काँग्रेसच्या संपर्कात? नाना पटोले म्हणतात...

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राज्यात पवार विरुद्ध पवार राजकारण सुरु असताना आता आणखी एक भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

Jul 6, 2023, 02:43 PM IST

'बीआरएस भाजपची 'बी' टीम तर तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा' काँग्रेसची टीका

भारत राष्ट्र समितीचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही,  महाराष्ट्रात परिणाम होणार नाही, तेलंगणा पॅटर्न फसवा असून लवकरच पोलखोल करू असा इशारा काँग्रेसने दिला आहे. पंढरीची वारी आस्थेचा, श्रद्धेचा विषय; केसीआरनी राजकीय फायदा उठवू नये असंही काँग्रेसने म्हटलं आहे. 

Jun 26, 2023, 06:01 PM IST

काँग्रेसमध्ये भाकरी फिरली! मुंबई अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती... भाई जगतापांची उचलबांगडी

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रसेच्या चंद्रकांत हंडोरे यांचा झालेला पराभव भाई जगताप यांना भोवल्याचं बोललं जात आहे. 

Jun 9, 2023, 10:54 PM IST

'हत्या, बलात्कार, दंगली आणि विरोधकांना धमक्या, राज्यात शिंदे फडणवीसांचं जंगलराज' - काँग्रेसचा आरोप

विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपवणे, हे नपुंसक सरकारचे धोरण आहे का? कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसेल तर सत्ता सोडा, आमचे सरकार आल्यावर गुन्हेगार आणि दंगेखोरांना सुतासारखे सरळ करू असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

Jun 9, 2023, 05:25 PM IST

कर्नाटकात सत्तांतर, महाराष्ट्रात काय? राज्यातील सिद्धरामय्या आणि शिवकुमार कोण?

कर्नाटकात भाजपचा पराभव करून काँग्रेसनं (Congress) सत्ता खेचून आणली  कर्नाटकपाठोपाठ आता महाराष्ट्रातही सत्तांतर घडवण्याची स्वप्नं काँग्रेस नेत्यांना पडू लागलीत... मात्र हे स्वप्न पूर्ण करू शकेल, एवढ्या ताकदीचा नेता महाराष्ट्रात काँग्रेसकडे आहे का?

May 16, 2023, 08:59 PM IST

Karnataka Results: "अरे, पवार साहेबांनी तिथे...", फडणवीसांचा कर्नाटक निकालावरुन टोला; उद्धव ठाकरेंनाही डिवचलं

Fadnavis Slams Pawar Thackeray: कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला असून याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांचा समाचार देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना घेतला.

May 13, 2023, 05:39 PM IST

Karnataka Result: भाजपाच्या पराभवानंतर फडणवीस 'आमचं फार नुकसान झालेलं नाही' असं का म्हणाले?

Karnataka Result Devendra Fadnavis Reacts: नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कर्नाटकाच्या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली असून त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांनाही खडे बोल सुनावले आहेत.

May 13, 2023, 05:09 PM IST

Karnataka Election 2023: कर्नाटकमध्ये भाजपाच्या पराभवाची 6 प्रमुख कारणं, 'या' चुका पडल्या महाग

Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेस (Congress) भाजपाचा (BJP) दारुण पराभव करत असल्याचं दिसत आहे. भाजपाने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्या हाती अपयश आलं आहे. दरम्यान यानिमित्ताने भाजपाच्या पराभवाची कारणं जाणून घेऊयात...

 

May 13, 2023, 01:21 PM IST

तब्बल 200 वर्षांनंतर कसं असेल Karnataka? पाहा भारावणारे AI Generated Photos

एरव्ही पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या या राज्याचा गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड कायापालट झाला आहे. किंबहुना या राज्याचं रुप पुढंही बदलत राहील. (Karnataka Travel Plan)

 

May 13, 2023, 11:44 AM IST

Karnataka Election 2023: CM बोम्मई कार्यालयात असतानाच आढळला साप, कार्यकर्त्यांची एकच धावपळ

Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असतानाच भाजपा कार्यालयात (BJP Office) साप आढळला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) या ठिकाणी उपस्थित होते. यानंतर एकच गोंधळ उडाला होता. 

 

May 13, 2023, 11:36 AM IST

Karnataka Election 2023 : 'करप्शन रेट कार्ड'मुळे काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाने मागितलं उत्तर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांनी जोर धरला आहे. आता काँग्रेसने निवडणुकीत केलेल्या एका जाहीरातीने नव्या वादाला तोंड फुटलं असून निवडणूक आयोगाने हा विष्य गांभार्याने घेतला आहे.

May 6, 2023, 09:57 PM IST

Karnataka Election : बजरंग दलाचा मुद्दा पेटला, आता काँग्रेसची भगवान हनुमानाबाबत मोठी घोषणा

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग दल आणि हनुमानाच्या मुद्द्यावर भाजपने रान उठवले आहे. पंतप्रधान मोदी यांनी बजरंग दलावर बंदी घालण्याच्या घोषणेची तुलना हनुमान बंदी असल्याचे म्हटले. तसेच माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जाळला तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा फाडला. राज्याच्या अनेक भागात मोर्चे काढलेत.

May 5, 2023, 08:38 AM IST