टॅक्सी

ओला, उबेर टॅक्सीविरोधात मुंबईत आज रिक्षा संप

ओला, उबेर यासह अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांवर निर्बंध आणावे यासाठी मुंबई ऑटो रिक्षा युनियनकडून आज एक दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांचे हाल होणार आहेत. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईतील रिक्षा या संपात सहभागी झालेल्या नाहीत.

Aug 31, 2016, 07:52 AM IST

रिक्षा, टॅक्सींचा प्रस्तावित संप मागे

 मुंबईकरांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. मुंबईकरांचा आजचा सोमवार सुरळीत पार पडणार आहे. कारण आजचा रिक्षा, टॅक्सी आणि बसेसचा संप मागे घेण्यात आलाय. त्यामुळे आज रिक्षा, टॅक्सी, बसेस रस्त्यावर नेहमीप्रमाणे धावणार आहेत.   

Aug 29, 2016, 08:29 AM IST

मुंबईकरांना दिलासा, सोमवारचा रिक्षा-टॅक्सीचा संप मागे

मुंबईतील सोमवारचा रिक्षा-टॅक्सीचा संप मागे घेण्यात आला आहे.

Aug 28, 2016, 10:55 PM IST

मुंबईकरांना दिलासा, टॅक्सी युनियनमध्ये उभी फूट

टॅक्सी, रिक्षांच्या २९ ऑगस्टपासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत युनियनमध्ये उभी फूट पडलीये.

Aug 26, 2016, 09:25 PM IST

मुंबईत रिक्षा - टॅक्सी चालकांनी संप केला तर होणार कारवाई

रिक्षा - टॅक्सी संपाविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले आहेत. ओला आणि ऊबर टॅक्सीला परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचालकांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

Aug 25, 2016, 04:39 PM IST

मुंबईत ओला - उबर टॅक्सीविरोधात टॅक्सी, रिक्षाची बेमुदत संपाची हाक

ओला आणि उबर टॅक्सीविरोधात जय भगवान टँक्सी आणि रिक्षा महासंघाने 29 ऑगस्टपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे.

Aug 24, 2016, 11:12 PM IST

टॅक्सी ड्रायव्हरने केला परदेशी महिलेचा विनयभंग

 महिलांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबईत एका परदेशी महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. सहा महिन्यांपूर्वी 32 वर्षाची इटालियन महिला मुंबईत आली होती. पण त्या महिलेला मुंबईचे रस्ते आणि ठिकाणांची अजून माहिती नसल्यामुळे बुधवारी रात्री 11 वाजता तिने पालीहिल वरुन सात बंगल्याला जाण्यासाठी उबेर टॅक्सी बुक केली. त्या उबेर टॅक्सीतून जाताना रहदारी नसलेली जागा पाहून त्या उबेर टॅक्सीच्या ड्रायव्हरने परदेशी महिलेचा विनयभंग केला.

Aug 20, 2016, 03:42 PM IST

ओला-उबेर टॅक्सीला कल्याणमध्ये नो एन्ट्री

प्रवाशांना स्वस्त आणि दर्जेदार सेवा पुरवणा-या ओला, उबेर, मेरु, टॅब या टॅक्सी सेवेचा धसका आता कल्याणमधील रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी घेतला आहे. 

Jul 31, 2016, 09:01 PM IST

व्हिडिओ व्हायरल : महिलेचं 'भूत' पुरुषामागे टॅक्सीत जाऊन बसलं

भूत आहेत की नाहीत यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण भुतांचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत समोर आले आहेत. ज्यामध्ये ते भूतच असल्याचा दावा करण्यात आला होता. जपानमधूनही असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे.

Jul 26, 2016, 01:00 PM IST

टॅक्सी आंदोलनाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड

ओला आणि उबेरला विरोध करण्यासाठी जय भगवान टॅक्सी महासंघाने आज आझाद मैदानात आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. 

Jun 21, 2016, 03:48 PM IST

मुंबईत टॅक्सी-रिक्षा चालकांचा संप

मुंबईत आज टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी संपाचं हत्यार उपसलंय. ओला आणि उबर टॅक्सी वाहतूक कंपनी विरोधात हे संपाचं पाऊल उचललंय. त्यातच रेल्वे विस्कळीत झाल्याने मुंबई करांचे हाल होत आहेत.

Jun 21, 2016, 08:27 AM IST

हटके प्रोफेशन...हटके अंदाज

हटके प्रोफेशन...हटके अंदाज

May 7, 2016, 11:35 PM IST