election 0

ट्रम्प यांनी केला यूपीतील विजयाचा उल्लेख आणि मोदींचं अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केलं. त्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसाठी खास डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं.

Jun 27, 2017, 01:29 PM IST

मोदी आणि शहांचं पुढचं लक्ष्य गुजरात

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केलं आणि उत्तर प्रदेशात ऐतिहासिक यश मिळवलं. त्यानंतर आता भाजपची पुढचं लक्ष्य गुजरातवर असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजप तयारी करत आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं राज्य आहे त्यामुळे भाजपला येथे यश मिळवायचं आहे.

Mar 20, 2017, 03:18 PM IST

राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. उत्तरप्रदेश निवडणुकीत मिळालेल्या नेत्रदीपक विजयाबद्दल राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

Mar 16, 2017, 02:26 PM IST

उत्तरप्रदेशमध्ये भाजप साजरा करणार विजयोत्सव

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ४ राज्यांमध्ये भाजपने आपली सत्ता स्थापन केली आहे. पंजाबसोडून इतर ४ राज्यांमध्ये भाजप आपली सत्ता आणण्यात यशस्वी झाला. गोवा, मणिपूरमध्ये दुसऱ्या स्थानावर राहुनही भाजप सत्ता मिळवण्यात यशस्वी राहिला. यूपी आणि उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा अजून बाकी आहे.

Mar 16, 2017, 11:50 AM IST

भाजपच्या उत्तर प्रदेशातील यशाने सेनेच्या पोटात गोळा

उत्तरप्रदेश निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटणं स्वाभाविक आहे. भाजपविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेला पुढच्या काळात अत्यंत काळजीपूर्वक, संयमानं पावलं उचलावी लागणार आहेत.... 

Mar 14, 2017, 11:50 PM IST

राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री म्हणूनच कामकाज पाहणार

राजनाथ सिंह मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशमध्ये जाणार नाहीत. विश्वसनीय सूत्रांनी झी मीडियाला ही माहिती दिलीय. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोणाला विराजमान करायचं याची चाचपणी सध्या सुरु आहे.

Mar 13, 2017, 02:41 PM IST

भाजपच्या विजयाने लालूंना धक्का, २०१९ पर्यंत अशी घेतली शपथ

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला मोठं बहुमत मिळालं. यामुळे विरोधकांना चांगलाच धक्का बसला आहे. राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना देखील याचा चांगलाच धक्का बसलेला दिसतोय. लालू यांनी त्यांच्या स्टाईलने होळी न खेळण्याची शपथ घेतली आहे.

Mar 13, 2017, 09:34 AM IST

दलितांच्या मतांमुळे भाजपला मिळालं महायश - रामदास आठवले

उत्तर प्रदेशात भाजपने पहिल्यांदा ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर तर विरोधकांना ही चांगलाच धक्का बसला. विरोधकांनीही पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं. ही मोदी लाट असल्याचं अनेक विरोधकांनी मान्य ही केलं. यावर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दलित मतदारांनी बहुजन समाज पक्षाला नाकारले. समाजवादी पक्ष, काँग्रेसचाही दारुण पराभव झाला. दलित मतदारांची मते भाजपला मिळाल्याने यश नव्हे तर महायश मिळाले अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली. 

Mar 12, 2017, 01:29 PM IST

राज ठाकरे आणि अखिलेश यादव यांचे एकच दुःख

 उत्तरप्रदेशात दारूण पराभव झाल्यानंतर मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया देताना उपरोधक टोला मारला आहे. मी राज्यात एक्स्प्रेस हायवे आणला. पण राज्यातील जनतेला बुलेट ट्रेन पाहिजे होती, त्यामुळे त्यांनी नव्या सरकारला निवडून दिले आहे. 

Mar 11, 2017, 05:46 PM IST

राहुल गांधींचं नेतृत्व मतदारांनी पुन्हा नाकारलं

देशात नुकताच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला अभूतपूर्ण यश मिळालं. ३ राज्यांमध्ये भाजप सरकार बनवणार आहे. मोदी-शहा यांच्या पुढे सगळेच नेते फ्लॉप ठरले. काँग्रेसचा पुन्हा एकदा पराभव झाला. राहुल गांधी यांचं नेतृत्व पुन्हा एकदा अपयशी ठरलं. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या काँग्रेसमुक्त भारत घोषणेला आणखी बळ मिळालं. 

Mar 11, 2017, 05:46 PM IST

उत्तरप्रदेश निकाल, मुख्यमंत्र्यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली

 शिवसेनेने मुंबई, महाराष्ट्रात भाजपची घोडदौड रोखली. आता सर्वाना शिवसेनेचे महत्व आणि ताकद कळाली असेल, या संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. 

Mar 11, 2017, 02:37 PM IST

मायावतींनी केली निवडणूक रद्द करण्याची मागणी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालानंतर मायावतींनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीत गडबड झाली असल्याचा आरोप केला आहे. इव्हीअम मशीनमध्ये गडबड केल्याचा आरोप मायवतींनी केला. कोणतंही बटन दाबलं तरी भाजपलाच मत जात होतं असा आरोप त्यांनी केला आहे. मायावतींच्या पक्षाचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे.

Mar 11, 2017, 02:37 PM IST

उत्तरप्रदेशच्या निकालावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

  हिंदुस्थानाच्या पंतप्रधानांचे आम्ही अभिनंदन करतो, लोकशाही प्रक्रियेतून आलेले हे निकाल असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार  संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. 

Mar 11, 2017, 01:25 PM IST