Google Map चा जेवढा फायदा तेवढाच तोटाही... हे App वापरणं महिलेच्या जीवावर बेतलं

Google Map वर विश्वास ठेवणं महिलेला पडलं महागात, अडकली मोठ्या संकटात

Updated: Nov 1, 2021, 07:03 PM IST
Google Map चा जेवढा फायदा तेवढाच तोटाही... हे App वापरणं महिलेच्या जीवावर बेतलं title=

मुंबई: प्रत्येकवेळी आपण नवीन ठिकाणी जाणार असून किंवा जायचं असेल तर आपल्याला रस्ते किंवा ठिकाण शोधायला गुगल मॅपचा आधार घ्यावा लागतो. गुगल मॅपमुळे एका महिलेचा जीव संकटात सापडला. ही महिला स्पेनमध्ये पोहोचली होती. तिला त्या परिसरातील कोणतीही गोष्ट माहिती नव्हती. बाजारातून घरी परत जाण्यासाठी तिने गुगल मॅपचा आधार घेतला. 

गुगल मॅपचा आधार घेऊन ती जाऊ लागली. रस्ता चुकू नये म्हणून तिथे गुगल मॅपची मदत घेतली. शॉर्टकटने लवकर घरी पोहोचावं म्हणून तिने गुगलने दाखवलेला रस्ता घेतला. मात्र गुगल मॅपचा रस्ता तिच्यासाठी अडचणीचा ठरला आहे. महिलेला काही कळण्याआत काही गुंडांनी तिच्यावर हल्ला केला. तिला बेदम मारहाण केली. 

मिररने दिलेल्या वृत्तानुसार महिलेने रेडइट या सोशल मीडियावर आपल्यासोबत घडलेला प्रसंग शेअर केला आहे. पीडित महिलेनं सांगितलं की काही काळापूर्वी स्पेनमध्ये शिफ्ट झाली होती. तिने मार्केटमध्ये खरीदी केली. त्यानंतर घरी जायला निघाली. तिने गुगलच्या मदतीनं घरी जाण्याचा मार्ग निवडला हाच तिच्या जीवावर बेतला. 

गुगल मॅपने तिला एक वाईट जागी पोहोचवलं. ती जागा होती चोरांनी, गुंडांनी भरलेली तिथे महिलेला लुटण्यात आले. तिला जबरदस्त मारहाण करण्यात आली. महिलेनं या गुंडाना विरोध केला तर तिला बेदम मारहाण करण्यात आली. या सगळ्या प्रसंगानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या महिलेला जेव्हा जाग आली तेव्हा तिला समजलं की आपण रुग्णालयात आहोत. 

रुग्णालयातील स्टाफने या महिलेला त्या परिसरात जाण्याची काय आवश्यकता होती असा प्रश्न केला. तो भाग गुन्हेगारांसाठी प्रसिद्ध असल्याचंही त्या नर्सने सांगितलं. माहिलेच्या म्हणण्यानुसार तिने पोलीस स्थानक गाठलं. तिथे पोलिसांना सांगताना माहिलेनं घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी महिला म्हणाली जर मी टेक्नॉलॉजीवर एवढा जास्त विश्वास ठेवला नसता तर आज हा दिवस आला नसता. घडलेल्या घटनेमुळे महिलाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. 

युझर्सनी देखील गुगल मॅप वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे. अनोळखी रस्ते किंवा गुगल मॅप वापरताना काळजी घेतली नाही तर अशा प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागू शकतो असंही या महिलेनं युझर्सना आवाहन केलं आहे.