आता चार्जरची डोकेदुखी संपणार; कधीही आणि कुठेही असा चार्ज करा तुमचा 'स्मार्टफोन'

ऐनवेळी चार्जिंग पॉईंट न मिळाल्याने अनेकदा पंचायत होते पण आता तसं होणार नाही 

Updated: Oct 26, 2022, 11:28 AM IST
आता चार्जरची डोकेदुखी संपणार; कधीही आणि कुठेही असा चार्ज करा तुमचा 'स्मार्टफोन' title=

आज जगभरात तंत्रज्ञान (technology) इतके पुढे गेले आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही. नवनवीन तंत्रज्ञान आता आपल्या जीवनाचं अविभाज्य भाग देखील बनलं आहे. काही तंत्रज्ञान असे आहेत ज्यामुळे आपलं जीवन बदललं आहे. सध्या सर्वजण स्मार्टफोन (smartphone) वापरतात आणि ते चार्ज (charging) करण्यासाठी काही वेळा मोठी मेहनत घ्यावी लागते. उदाहाराणार्थ चार्जिंग (charging) लावायला चार्जिंग पॉईंट (charging point) न मिळण्यापासून ते ऐनवेळी चार्जर जागेवर नसणं. एखाद्या महत्त्वाच्या वेळी असं काही घडल की मोठी किंमतही चुकवावी लागू शकते. मात्र आता हे चार्जरच (charger) हद्दपार होण्याची शक्यता आहे. कदाचित मोबाईल (Mobile) कंपन्या स्मार्टफोनसोबत चार्जर देणार नाहीत. कारण आता ई- टेक्सस्टाईल (E-Textile) नावाचे तंत्रज्ञान बाजारात आले आहे ज्यामध्ये फक्त तुम्ही तुमच्या कपड्यांवरुनच (fabric) स्मार्टफोन (smartphone) चार्ज करता येणार आहे. (E Textile technology clothes charge your smartphone)

ई-टेक्सटाईल (E-Textile) तंत्रज्ञान काय आहे?

ई-टेक्सटाईल (E-Textile) हे खरे तर एक खास कापड आहे जे सामान्य कापडांपेक्षा (fabric) खूप वेगळे आहे. तुम्ही ते घालू शकता त्यासोबत याचा आणखी एक जबरदस्त असा फायदा आहे. हे कापड तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकते. हे कापड (fabric) स्वतःमध्येच सौरऊर्जा साठवून ठेवते आणि तुम्ही जेव्हा हवा तेव्हा त्याचा वापर करु शकता आणि तुमचा स्मार्टफोन (smartphone) चार्ज करू शकता. कापड जेवढे मोठे असेल तेवढी सौरऊर्जा साठवली जाईल आणि तुम्ही तुमचा स्मार्टफोन अधिक वेळ चार्ज करू शकाल.

हे तंत्रज्ञान कुठून आलं?

नॉटिंघम ट्रेंट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हे खास कापड तयार केले आहे.  आजपर्यंत हे अगदी काल्पनिक होते पण आता ते सत्यात उतरलं आहे. विशेष म्हणजे हे कापड स्वतःमध्ये सौर ऊर्जा साठवते ज्याचा वापर तुम्ही तुमचे कोणतेही गॅझेट चार्ज करण्यासाठी करू शकता. या कापडाद्वारे तुम्ही स्मार्टफोन तसेच स्मार्टवॉच आणि इअरबड्सच चार्ज करु शकता.

या कापडात सौर उर्जा साठवून ठेवण्यासाठी शास्त्रज्ञांनी त्यात 1,200 लहान फोटोव्होल्टेइक सेल (सौर पॅनेल) वापरल्या आहेत. त्यामुळेच आत मुबलक प्रमाणात सौर ऊर्जा साठवली जाते, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे गॅझेट चार्ज करू शकता. हे कापड 400 मिलीवॅट विद्युत ऊर्जा निर्माण करण्यास सक्षम आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे गॅझेट सहज चार्ज करू शकाल. सध्या या तंत्रज्ञानावर काम सुरू आहे पण भविष्यात ते सर्वांसाठी उपलब्ध होईल.