VIDEO : हत्तीचं पिल्लू आई-वडिलांसमोर पाण्यात पडलं आणि...

आपल्या चिमुरड्याचा जीव धोक्यात असेल तर आई-वडील स्वत:चा जीव धोक्यात घालत धावत-पळत त्यांच्यासाठी हजर होतात... मग तो माणूस असो किंवा प्राणी...

Updated: Jun 21, 2017, 01:01 PM IST
VIDEO : हत्तीचं पिल्लू आई-वडिलांसमोर पाण्यात पडलं आणि... title=

मुंबई : आपल्या चिमुरड्याचा जीव धोक्यात असेल तर आई-वडील स्वत:चा जीव धोक्यात घालत धावत-पळत त्यांच्यासाठी हजर होतात... मग तो माणूस असो किंवा प्राणी...

अशाच एका प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतोय. सियोल ग्रँड पार्कमध्ये ही घटना घडलीय.... आणि या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. 

या व्हिडिओत, एक चिमुकला हत्ती पाणी पिताना पुलात पडताना दिसतोय... त्यानंतर बाजूलाच असलेले आई-वडील त्याचा जीव वाचवण्यासाठी कसा प्रयत्न करतात... हे कोणत्याही व्हिडिओतून दिसून येतंय... त्यासाठी कोणत्याही शब्दांची गरज भासत नाही, हे विशेष.... 

हा व्हिडिओ गेल्या २४ तासांत २८,००० हून अधिक वेळा पाहिला गेलाय.