मोबाईलमधून कॉन्टॅक्ट डिलीट झाले, तर काय कराल...

 कॉन्टॅक्ट रिकव्हर करण्यासाठी काय करता येईल? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा... 

Updated: Nov 15, 2018, 01:22 AM IST
मोबाईलमधून कॉन्टॅक्ट डिलीट झाले, तर काय कराल...  title=

मुंबई : आपला मोबाईल हरवला, खराब झाला किंवा चुकून मोबाईलमधले सगळे कॉन्टॅक्ट डिलीट झाले... तर तुम्हालाही भलतंच टेन्शन आलं असेल ना... साहजिकच आहे! हा अनुभव तुम्हीही घेतला असेल तर कॉन्टॅक्ट रिकव्हर करण्यासाठी काय करता येईल? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा... 

- तुमचं जीमेल अकाऊंट ओपन करा

- यानंतर जीमेलच्या डाव्या बाजुला लिहिलेल्या 'जीमेल'वर क्लिक करून 'कॉन्टॅक्ट'ला क्लिक करा

- लगेचच तुम्हाला तुमच्या फोनमध्ये असलेले सर्व कॉन्टॅक्ट दिसतील. इथून हे सर्व कॉन्टॅक्ट तुम्ही सहजच कॉपी करू शकता.

- जर तुमच्या फोनमध्ये सर्व कॉन्टॅक्ट दिसत नसतील तर Setting मध्ये जाऊन कॉन्टॅक्ट बॅकअप On करा

- याशिवाय Setting मध्ये account and sync ला सिलेक्ट करा. यात 'add account' ला क्लिक करा आणि तिथं आपल्या जीमेल अकाऊंटला अॅक्टिव्हेट करा

- यामुळे तुम्हाच्या मोबाईलमध्ये जितके कॉन्टॅक्ट असतील ते आपोआप बॅकअप होत राहतील