हुवावे कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन लॉंन्च, पाहा किंमत

युजर्सला केवळ ३० मिनीटांत ८५ टक्के बॅटरी चार्ज करता येणार आहे.

Updated: Feb 25, 2019, 04:26 PM IST
हुवावे कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन लॉंन्च, पाहा किंमत title=

मुंबई : मोबाईल वर्ल्ड काँग्रेस कार्यक्रमाला सुरूवात झाल्यानंतर जगातील अनेक मोबाईल कंपन्यांनी या कार्यक्रमात आपला सहभाग घेतला आहे. नोकिया मोबाईल कंपनीने या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण पाच नवीन मोबाईल लॉन्च केले आहेत. तसेच चायनीज स्मार्टफोन निर्माते हुवावे (Huawei) कंपनीने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१९ या कार्यक्रमात त्यांचा पहिला फोल्डेबल फोन लॉन्च केला आहे. फोल्डेबल मोबाईलचे नाव Huawei Mate X असे आहे. याआधी सॅमसंग कंपनीने त्यांचा फोल्डेबल फोन लॉन्च केला होता. बहुप्रतिक्षीत फोल्डेबल स्मार्टफोन येत्या काळत अनेक स्मार्टफोन कंपन्या लॉन्च करणार आहेत.

दोन्ही बाजूस डिस्प्ले असल्यामुळे हा फोल्डेबल मोबाईलचे रूपांतर टॅबलेटमध्ये सुद्धा करता येणार आहे. त्याचा डिस्प्ले ६.६ इंच आहे. फोल्डे केल्यानंतर हा फोन ८ इंच होतो. ८ जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये ५१२ जीबी स्टोअरेज देण्यात आले आहे. या फोल्डेबल फोनची किंमत तब्बल २ लाख १० हजार रूपये आहे. पुढील काही महिन्यांमध्ये फोनची विक्री सुरू होणार आहे. या फोन व्यतिरिक्त कंपनी लवकरच Mate 20X 5जी फोन लॉंन्च करणार आहे.

Huawei Mate X ड्युअल सिमकार्ड आहे. तसेच हा फोनमध्ये अँड्रॉइड 9 पी व्हर्जन देण्यात आले आहे. या फोनची बॅटरी क्षमता ४५०० एमएएच असणार आहे. या स्मार्टफोन मध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. युजर्सला केवळ ३० मिनीटांत ८५ टक्के बॅटरी चार्ज करता येणार आहे. कंपनीने सांगितले की हा स्मार्टफोन बाजारात दाखल झाल्यावर ग्राहकांना पाहताच आवडेल. या स्मार्टफोन मध्ये 5G नेटवर्क समावेश करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे 5G नेटवर्कच्या मदतीने केवळ तीन सेकंदात 1GB फाईल डाउनलोड करू शकतो.