व्याजाशिवाय असे मिळवा २० हजार रुपयांचे कर्ज, लुटा खरेदीचा आनंद

प्रायव्हेट सेक्टरमधील आयसीआयसीआय बँक पेटीएमच्या साथीने लहान कर्जाची सुविधा उपलब्ध करुन देत आहे. जर तुम्ही आयसीआयसीआयचे ग्राहक आहात आणि पेटीएमद्वारे तुम्ही २० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेऊन खरेदी करता तर पुढील ४५ दिवसांसाठी तुम्हाला कोणतेच व्याज द्यावे लागणार नाही. 

Updated: Nov 16, 2017, 11:47 PM IST
व्याजाशिवाय असे मिळवा २० हजार रुपयांचे कर्ज, लुटा खरेदीचा आनंद  title=

नवी दिल्ली : प्रायव्हेट सेक्टरमधील आयसीआयसीआय बँक पेटीएमच्या साथीने लहान कर्जाची सुविधा उपलब्ध करुन देत आहे. जर तुम्ही आयसीआयसीआयचे ग्राहक आहात आणि पेटीएमद्वारे तुम्ही २० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेऊन खरेदी करता तर पुढील ४५ दिवसांसाठी तुम्हाला कोणतेच व्याज द्यावे लागणार नाही. 

बँकेच्या माहितीनुसार ४५ दिवसांत एखाद्या ग्राहकाने पैसे परत न केल्यास ५० रुपये लेट फी आणि ३ टक्के व्याजासह रक्कम परत करावी लागेल. 

पेटीएम-आयसीआयसीआय बँक पोस्टपेड नावाचे हे डिजीटल क्रेडिट अकाऊंट लगेच सुरु होईल आणि गरज पडेल तेव्हा ग्राहकांना लगेचच पैसे ट्रान्सफर होतील असा दावा बँकेने केलाय.

एकावेळेला तुम्ही २० हजार रुपयांपर्यंत लोन घेऊ शकता. आयसीआयसीआयचे कार्यकारी संचालक अनुर बागची यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्ज किती वेळा घ्यावे यासाठी कोणतीही मर्यादा नाही. मात्र पेटीएम-आयसीआयसीआय बँक पोस्टपेड कार्डावर थकबाकीच्या रकमेला मर्यादा आहे. बागची पुढे म्हणाले, सध्या ही योजना आयसीआयसीआयच्या ग्राहकांसाठी आहे. मात्र ही योजना सफल झाल्यास दुसऱ्या बँकेतील ग्राहकांनाही सुविधा दिली जाऊ शकते.