1299 रुपयांना मिळत आहे हा धासू 4G स्मार्टफोन...

चायनीज स्मार्टफोन निर्माता कंपनी आयवुमीने (iVoomi)भारतीय बाजारात 4G स्मार्टफोन iVoomi V5 लॉन्च केला आहे. 

Updated: Jun 8, 2018, 01:16 PM IST
1299 रुपयांना मिळत आहे हा धासू 4G स्मार्टफोन... title=

मुंबई : चायनीज स्मार्टफोन निर्माता कंपनी आयवुमीने (iVoomi)भारतीय बाजारात 4G स्मार्टफोन iVoomi V5 लॉन्च केला आहे. शटरप्रूफ डिस्प्लेसोबत येणाऱ्या हा iVOOMi V5 4G वीओएलटीई स्मार्टफोन आहे. फोनमध्ये 480x854 रिजोल्यूशन पिक्सलचा 5 इंचाचा  टचस्क्रीन डिस्प्ले आहे. कंपनीतर्फे या फोनची किंमत 3,499 रुपये ठरवण्यात आली आहे. हा फोन स्नॅपडीलवर (www.snapdeal.com) मिळत आहे. खास गोष्ट ही की यावर एक खास प्राईज मिळत आहे. रिलायन्स जिओसोबत करार केल्याने iVOOMi V5 फोनच्या खरेदीवर  2200 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्यामुळे हा फोन तुम्हाला फक्त 1,299 रुपयांना मिळेल. 

स्मार्टफोन्सचे फिचर्स

  • 1.2 गीगा हर्टज चे क्वाडकोर प्रोसेसर आणि 1GB रॅम.
  • 5 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले.
  • 8 GB इंटरनल स्टोरेज. मायक्रो एसडी कार्डने 128 GB पर्यंत वाढवू शकता.
  • 5 मेगापिक्सलचा फ्रंट आणि रिअर कॅमेरा.
  • एंड्रायड 7.1 वर हा फोन रन करतो.
  • 2800 mAh ची बॅटरी
  • 160 ग्रॅमच्या या फोनमध्ये ड्युअल सिम (जीएसएम) ची सुविधा दिली आहे.
  • फोनमध्ये नॅनो सिमकार्ड युज होईल. 
  • कनेक्टिव्हीटीसाठी यात वायफाय, ब्लुटूथ, एफएम, 3G आणि 4G आहे.

काय आहे ऑफर?

गेल्या काही दिवसांपासून सुरु झालेल्या जिओ फुटबॉल ऑफर (Jio Football Offer)च्या अंतर्गत iVoomi खरेदी केल्यास आणि जिओ नंबर वर 198 किंवा 299 रुपयांचे रिचार्ज केल्यास त्यावर 2,200 रुपयांचे कॅशबॅक मिळेल. ही ऑफर 30 जूनपर्यंत व्हलिड आहे. रिचार्ज केल्यानंतर 50 रुपयांचे 44 व्हाऊचर्स मिळतील. जे मायजिओ अॅपमध्ये क्रेडीट होतील. याशिवाय स्नॅपडील वरुन एचडीएफसी आणि एक्सिस बॅंक क्रेडीट कार्डच्या माध्यामातून फोन खरेदी केल्यास त्यावर 10% एक्सट्रा डिस्काऊंट मिळेल.