'Real mi A1' स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च !

 ड्यूयल कॅमेरा, इनबिल्ड मेमरी, रॅम हे सर्व कमी किंमतीत देणारा स्मार्टफोन असेल तर तो  कोणाला नकोसा असणार ?

Updated: Jan 1, 2019, 01:04 PM IST
 'Real mi A1' स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च ! title=

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोन कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. कमी किंमतीत जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या स्मार्टफोनकडे तरुणाई आकर्षित होताना दिसतेय. अनेक स्मार्टफोन कंपन्याही ग्राहकांची गरज ओळखून तसे स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. ड्यूयल कॅमेरा, इनबिल्ड मेमरी, रॅम हे सर्व कमी किंमतीत देणारा स्मार्टफोन असेल तर तो  कोणाला नकोसा असणार ? स्मार्टफोन कंपन्या ग्राहकांच्या आवडीनिवडींवर लक्ष ठेवून आहेत. ग्राहकांना काय अपेक्षित आहे याचा त्या विचार करीत असतात. बाजारात मोठी पसंती मिळवणारी शिओमी कंपनी नवीन 'रिअल मी A1' स्मार्टफोन घेऊन येत आहे. रिअलमीचा हा सर्वाधिक स्वस्त स्मार्टफोन असणार आहे.

'रिअलमी  ए१'ची किंमत बाजारात उपलब्ध असणाऱ्या रिअलमी यू१ स्मार्टफोनच्या किंमतीच्या जवळपास असणार आहे. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज असलेला रिअलमीचा यू१ स्मार्टफोन बाजारात ११ हजार ९९९ रुपयामध्ये मिळत होता. त्यानंतर रिअलमी यू१ची क्षमता वाढवून त्याच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत १४ हजार ९९९ करण्यात आली आहे. रिअलमीचा ए१ स्मार्टफोन काळ्या आणि पिवळ्या रंगात उपलब्ध होणार आहे.

सध्या बाजारात शिओमीच्या ४ स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्यामध्ये रिअलमी यू१, रिअलमी २ रिअलमी २ प्रो, रिअलमी सी१ या स्मार्टफोनचा समावेश आहे. अद्याप रिअलमी ए१ स्मार्टफोनमधील स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला नाही. पण हा स्मार्टफोन रिअलमी यू१ सारखा असेल, असे सांगण्यात येत आहे. रिअलमी ए१च्या किंमतीबाबत कंपनीतर्फे अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नसली तरी तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, या स्मार्टफोनची किंमत १० हजार रुपयांच्या जवळ असणार आहे.  कंपनीने मागील महिन्यात रेडमी ६ए स्मार्टफोन ६ हजार ९९९ रुपयात लॉन्च केला होता. नंतर या फोनची किंमत वाढवून ७ हजार ९९९ रुपये करण्यात आली. रिअलमी ए१ला देखील बाजारात अशीच प्रसिद्धी मिळवणार, अशी कंपनीची आशा आहे.